Beed Assembly Election 2024 Sakal
मराठवाडा

Beed Assembly Election 2024 : सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आता ७३ मतदान केंद्रांची वाढ

Beed latest News In Marathi | गर्दीमुळे होणारी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय; एकूण २ हजार ४१६ मतदान केंद्रांची संख्या असणार

सकाळ वृत्तसेवा

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून एकूण २ हजार ३४४ इतके मतदान केंद्र होते. आता यामध्ये ७३ मतदान केंद्रांची वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून जिल्ह्यामध्ये आता एकूण २ हजार ४१६ मतदान केंद्रांची संख्या असणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गेवराई मतदार संघात नवीन ७ मतदान केंद्रे वाढवण्यात आले आहेत तर ५ केंद्राचे विलीनीकरण करण्यात आले आहे.

तसेच १४ केंद्राच्या जागेत बदल करण्यात आला असून दोन मतदान केंद्राच्या नावात बदल होणार आहे. माजलगाव मतदारसंघातील एकूण १७८ मतदान केंद्रांमध्ये १६ केंद्रांची वाढ होणार आहे. दोन केंद्रांचे विभाजन करून १५ केंद्राचे ठिकाण बदलण्यात आले आहे, आठ केंद्रांचे नाव बदलण्यात आले आहे.

बीड मतदार संघामध्ये एकूण ३७६ मतदान केंद्रामध्ये २० ने वाढ करण्यात आली असून ९ केंद्राचे विलीनीकरण करून १५ केंद्रांचे ठिकाण बदलून पाच केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे.

आष्टी मतदारसंघातील ४४० केंद्रांमध्ये मात्र वाढ करण्यात आलेली नसली तरी एका केंद्राचे विभाजन करण्यात आले असून ७ केंद्राच्या ठिकाणांत बदल करण्यात आला आहे. केज मतदार संघामधील ४१३ मतदार संघामध्ये ७ केंद्रांची वाढ करण्यात आली असून दोन केंद्रांचे विलीनीकरण करून १८ केंद्रांच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे तर ७ केंद्रांचे नाव बदलण्यात आले आहे.

परळीत २३ नवीन केंद्रे

परळी मतदारसंघातील ३४० केंद्रांमध्ये २३ नवीन केंद्रांची भर पडली असून ९ केंद्रांचे विलीनीकरण झाले आहे. सहा केंद्रांचे नाव बदलण्यात आले आहे. या प्रकारे एकूण २ हजार ३४४ मतदान केंद्रामध्ये ७३ नवीन केंद्राची वाढ झाली आहे तर २८ केंद्रांचे विलीनीकरण झाले आहे तसेच ६९ केंद्रांच्या ठिकाणात बदल करून २८ केंद्रांच्या नावात देखील बदल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT