inflation affect raksha bandhan 15 to 20 percent increase in Rakhi rates  sakal
मराठवाडा

Raksha Bandhan 2022 : बहीण-भावाच्या सणाला महागाईची झळ

रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठा सजल्या; राख्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

देवगावफाटा/जिंतूर : बहिण- भावाच्या स्नेहाचे प्रतीक असणारा रक्षाबंधन या पवित्र सणासाठी बहिणींची आपापल्या बंधुराजाला साजेशी आणि सुबक राखी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. मात्र, यंदा बहिण-भावाच्या या पवित्र सणाला महागाईचा फटका बसला आहे. कच्च्या मालाची दरवाढ झाल्याने राख्यांचे दर १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. बहिण- भावाचे नाते मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवणारा सण आज गुरुवारी (ता. ११) साजरा होत आहे. त्यानिमित्त रंगीबेरंगी, मनमोहन राख्या बाजारात विक्रीस आल्या आहेत. राख्यांचे विविध प्रकार बाजारात दिसून येत असले तरी रेशमी गोंड्याच्या राख्यांची मागणी पूर्वापार कायम आहे. मणी, टिकल्या, कुंदन, खडे यांचा वापर करून तयार केलेल्या राख्याही विक्रीस उपलब्ध आहेत.

दोन रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत राखीची किंमत सांगण्यात येत आहेत. फॅन्सी राख्याबरोरच धार्मिक राख्यांचाही समावेश आहे. त्यामुळे श्री ओम, स्वस्तिक, कमळ असलेल्या तसेच रूद्राक्षाच्या राख्यांचीही विक्री सुरू आहे. केवळ राखी नव्हे तर कायमस्वरूपी हातात राहील, म्हणून ब्रेसलेट सारख्या राख्याही बाजारात आल्या आहेत. २५० ते ४५० रुपयांपर्यंत ब्रेसलेट राख्या उपलब्ध आहेत. विविध आकारातील किंवा अमेरिकन डायमंड असलेले छोटे पदक धाग्यात गुंफलेल्या किंवा रंगीत मनी चांदीच्या गोफात बसविलेल्या राख्यांच्या किमती ३५० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत आहे. सुवर्णाकडे तर सोन्या चांदीच्या राख्याही तयार आहेत.

लहान मुलांसाठी आकर्षक राख्या

भिंतीवर चढणारा स्पायडरमॅन, मिकीमाऊस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाइट, जू-जू वंडरबॉय, टेडी बियर, छोटा भीम, डेरेमान, पोंगो, निंजा, हातोडी आदी राख्या यावर्षी लहान मुलांचे आकर्षण ठरल्या आहेत.

राख्यांमधील नावीन्यता

यावर्षी लायटिंग राखीमध्ये स्पीनर लायटिंग राखी आणि कपल राखी अर्थात महिला- पुरुष अर्थात दोघांसाठीही असलेल्या राख्या बाजारात आलेल्या आहेत. स्पीनर राखीस असलेले बटन दाबले की विविध रंगीत लायटींगने राखीची आकर्षिता वाढविते.

यंदा कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने राख्यांच्या दरात १५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ५० रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत प्रती डझन राख्यांचे दर आहेत.

-संदीप माहूरकर, राखी विक्रेता, जिंतूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT