Manoj Jarange Patil 
मराठवाडा

Manoj Jarange Patil: रस्ते अडवून वाळीत टाकलं, मराठ्यांवर प्रचंड अन्याय सुरु; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

कार्तिक पुजारी

जालना: मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून मराठा समाजासाठी आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. जरांगेंची तब्यत बिघडत असल्याने राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. अनेक जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी सरकारवर विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

मराठ्यांवर प्रचंड अन्याय सुरु आहे. मिडिया याला साक्षीदार आहे. आम्ही ओबीसींच्या विरोधात लढत नाही. आमचे रस्तेच बंद करण्यात आले आहेत. आम्ही जर हे केले असते तर आम्हाला म्हणाले असते आम्ही वाळीत टाकलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आता शेवटची संधी आहे, पुन्हा बोलायला जागा राहणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

पूर्वी बोद्धांसोबत किंवा इतर समाजासोबत असं होत होतं आता ते आमच्यासोबत होत आहे. रस्ते अडवले आहेत. हा त्यांच्या बापाचा रस्ता आहे का? सरकारचा हा रस्ता आहे. आता मराठ्यांना वाळीत टाकलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ राज्य चालवत आहेत का? असा सवाल जरांगे यांनी केला.

आम्हाला दुसरीकडून रस्ते दिले आहेत. महामार्ग कोणाच्या बापाची संपत्ती आहे का? सुरुवात तुम्ही केली असली तरी शेवट मराठेच करणार. लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजासाठी लढत नाहीत. आरक्षण मिळालं नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस दोषी असतील, असं जरांगे म्हणाले आहेत

मराठा समाज आक्रमक

उपोषणकर्त्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालवल्यानंतर,पुण्याच्या भोर मधील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांची खालावत चाललेली परिस्थिती पाहता, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळ अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता, स्वतः पुढाकार घेऊन जरांगे यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात. सरकारने दोन दिवसात उपोषणाची दखलं घेऊन उपोषण थांबवलं नाही, आणि जरांगे यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर एकाही नेत्याला आणि मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणारं नाही, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: काय सांगता! पुण्यातील 32 गावं विकणे आहेत; गावकऱ्यांनीच काढली जाहिरात; कारण काय?

BookMyShow Crashed: भारतीय चाहत्यांमध्ये 'Coldplay'ची झिंग, तिकिट विक्रीपूर्वीच बुक माय शो क्रॅश

Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदार यादी, इव्हीएम बॅलट युनिट पडताळणीसह केंद्रांची निश्चिती

Saptshringi Gad : सप्तशृंगी गड घाट रस्ता 23, 25 व 26 सप्टेंबरला सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत बंद राहणार..

Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील अपघातांचा आलेख घसरला, नागपूर विभागात मृतांचीही संख्या निम्म्यावर

SCROLL FOR NEXT