datta chavan sakal
मराठवाडा

UPSC-MPSC परिक्षेत दोन वेळा अपयश, दत्ता चव्हाण तिसऱ्यांदा MPSCच्या परिक्षेत यश संपादन करत बनला क्लासवन अधिकारी!

अभियंताचे शिक्षण घेऊन बीडमधील गेवराईच्या दत्ता चव्हाण याने युपीएससी तयारी केली.मात्र, दोन वेळा परिक्षा देऊन यात अपयश आल्याने त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा(एमपीएससी) परिक्षेची तयारी सुरु केली.

भास्कर सोळंके

जातेगाव(जि.बीड) : अभियंताचे शिक्षण घेऊन बीडमधील गेवराईच्या दत्ता चव्हाण याने युपीएससी तयारी केली.मात्र, दोन वेळा परिक्षा देऊन यात अपयश आल्याने त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा(एमपीएससी) परिक्षेची तयारी सुरु केली.

या परीक्षेत देखील दोन वेळेस अपयश आले.तरीही त्याने क्लास वन अधिकारी होण्याचे ध्येय गाठायचेच असा दृढनिश्चय करत रोज दहा तास आभ्यासात जीव ओतून दत्ता चव्हाण याने अखेर नऊ वर्षांनंतर एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, व्हिजेएनटी मधुन राज्यात दुसरा येत अखेर वर्ग एक(क्लासवन) अधिकारी होण्याचे ध्येय गाठले.ऊसतोड मजुर असलेल्या आई वडील यांच्या कष्टाचे चीज करुन दाखवल्याने दत्ता चव्हाण याचे गेवराईत अभिनंदन होत आहे.

गैबीनगर तांडा (ता गेवराई जि.बीड)येथील ऊसतोड कामगाराचा मुलगा दत्ता दिनकर चव्हाण याचे प्राथमिक शिक्षण तांड्यावरील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक आश्रम शाळा वारोळा(ता माजलगाव)तर उच्च माध्यमिक शिक्षण गेवराईतील गढी येथील जयभवानी उच्च माध्यमिक विद्यालयात पुर्ण केले.

छत्रपती संभाजीनगर येथे अभियंताचे शिक्षण घेऊन त्याने थेट युपीएससी परीक्षेची तयारी करण्यात दिल्ली गाठली. परंतू या परिक्षेत दोन वेळेस अपयश आल्याने दत्ता चव्हाण याने पुणे शहरात जाऊन एमपीएससीच्या परिक्षेची तयारी सुरु केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेत देखील दोन वेळा अपयश आले.मात्र अपयशाला खचून न जाता दत्ता चव्हाण याने रोज दहा तास जीव ओतून आभ्यास केला. २०२३ ला त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा दिली.

या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, दत्ता चव्हाण याने व्हिजेएनटी मधून राज्यात दुसरा क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने असिस्टंट कमिशनर कौशल्य विकास किंवा उद्योजकता अधिकारी या पदावर एक(क्लासवन) अधिकारी म्हणून निवड होणार आहे.

-ऊसतोड मजुर असलेल्या आई वडील यांच्या कष्टाचे चीज झाले-

अल्पभूधारक शेतकरी दिनकर चव्हाण यांनी परीवाराच्या उदरनिर्वाहासाठी जिल्हा परजिल्ह्यातील विविध साखर कारखान्यासाठी २० ते २५ वर्षे ऊसतोड कामगार म्हणून कोयता हातात घेत, पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिक्षण दिले. एवढंच नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी जवळपास पाच एक्कर शेती विकली.मात्र, आई-वडिल यांच्या कष्टाचे चीज करुन दत्ता चव्हाण याने एमपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने त्याचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही परिक्षेत यश संपादन करायचे असल्यास जिद्द,चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आभ्यासात जीव घातला तर निश्चितच यश येते.युपीएससी व एमपीएससी परिक्षेत दोन वेळेस अपयश येऊन देखील खचून न जाता आभ्यासात जीव घातल्याने यश मिळाले आहे.

- दत्ता चव्हाण,गैबीनगर तांडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

Kolhapur North Results : सतेज पाटलांचा बालेकिल्ला ढासळला; राजेश लाटकरांना अपेक्षित मताधिक्य नाहीच!

SCROLL FOR NEXT