Jalna: आढा (ता.जाफराबाद) येथील शेतकरी गणेश तेजराव वाकोडे यांच्या शेतातील 50 फूट खोल विहिरीत गुरुवारी रात्री (ता.२७) तीन रोहि पडल्याचे शेतकऱ्याला आढळून आले. त्यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्या अनुषंगाने वन परीक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे यांनी घटनास्थळी वनविभागाकडून मॅन विथ इंडीज संस्थेच्या रॅपिड रेस्क्यू पथकाला पाठविले.
रेस्क्यू टीम घटनास्थळी तात्काळ पोहोचून पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका रोहिला वाचवण्यात यश आले. त्या रुईच पारा पायाला मार लागला असल्याने तर डॉक्टर मनोज कुमार पांडे यांनी बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. इतर दोन रोहि चा विहिरीतच मृत्यू झाला.
आढा येथील शेतकरी श्री वाकोडे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात पाहणीसाठी गेले असता तीन रोहिं विहिरीत पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात वन विभागाला कळविले. दरम्यान विहिरीत रोही पडल्याची माहिती गावकऱ्यांना होतातच विहिरी भोवती मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी गर्दी केली.
पन्नास फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये खडक असल्याने दोन रोहि ना मार लागून ते गंभीर जखमी झाले.त्यातच त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान वनविभागातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील मॅन विथ इंडीज संस्थेच्या रॅपिड रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. वन्यजीवरक्षक आशिष जोशी व त्यांच्या टीमने ५ तासांच्या अथक प्रयत्नांनी सर्वांना शिताफीने बाहेर काढले.
मृत झालेल्या दोन रोहि चां पोस्टमार्टम करून त्यांना त्याच परिसरात खड्डा खोदून दफनविधी करण्यात आला. तर एका रोहीच्या पायाला मार असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला जालन्यातील वन उद्यानात आणून उपचार करण्यात आले व नंतर जालना येथील व नद्यांना सोडून देण्यात आले.
या कार्यवाहीत रेस्क्यू टीमचे दिपक वाटाणे, मनोज गायकवाड, चिदंबर काळे, सुरज पानकडे, अनिकेत वाघमारे यांनी योगदान दिले. तसेच वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी योगेश डोमळे, डॉ. मनोजकुमार पांडे, डॉ. झांबरे हे यावेळी उपस्थित होते.
आढा, पासोडी शिवारामध्ये रोहींसह हरिण रानडुक्कर यांचा मुक्त संचार असतो या वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. या वन्य प्राण्यांची वाढती संख्या शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. परिसरामध्ये सोयाबीन उडीद, तूर ,मका ही पिके घेतली जातात. या पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यांकडून नासाडी होते याबाबत वारंवार वन विभागाकडे तक्रारी करू नये प्राण्यांचा बंदोबस्त होत नाही.
शेतकऱ्यांकडून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत असली तरी कायद्याप्रमाणे वन्य प्राण्यांना स्थलांतरित करता येत नाही किंवा इतर ठिकाणी जंगलात नेऊन सोडता येत नाही. सर्वच भागांमध्ये रोहींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे यामुळे त्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी काय करता येईल या संदर्भाची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना जागून काढावी लागते रात्र
आडा येथील शेतकरी सुनील गजरे, शिवाजी गजरे, वैभव काळे, विठ्ठल गजरे, रामू काळे, रामदास गजरे, गजानन खडके, रामू खडके ,शेषराव व्यवहारे, एकनाथ खडके, बबन सौर, भीमसिंग कायटे ,रायसिंग कायदे आमचे शेतकरी पिक उभारी साले तर वन्य प्राण्यांकडून पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्र जागून काढावी लागते यामुळे या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.