माजलगाव (जि.बीड) : येथील जाजू हॉस्पिटलमध्ये गरोदर (Pregnancy) मातेचा बाळासह मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.१६) सकाळी घडली. या प्रकरणी डॉ. जाजू दाम्पत्यावर शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. जाजू दाम्पत्यास अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील खेर्डा येथील सोनाली पवन गायकवाड (वय २२) या जाजू हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. प्रसुतकळा दरम्यान रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोनाली यांना त्रास होत असल्याने त्या ओरडू लागल्या. यावर डॉक्टरांनी तपासणी करत प्रसुतीदरम्यान असे दुखत असते असे सांगितले. (Jaju Doctor Couple Arrested For Mother And New Born Baby Death Case In Majalgaon Of Beed)
पहाटे तीन वाजता सोनाली यांना झटका आल्याने त्या बेशुध्द पडल्या. त्यावर डॉ. उर्मिला जाजू व डॉ. विजयकुमार जाजू यांनी रूग्णास शुध्दीवर आणले. नातेवाईकांनी प्रसुती नॉर्मल होईल का असे विचारले होते तर प्रसुती नॉर्मल होईल असे डॉक्टरांनी सांगितले. पहाटे सोनाली यांची प्रसुती नॉर्मल झाली परंतु बाळ मृत झाल्याचे डॉ. उर्मिला जाजु यांनी सांगितले आणि याचवेळी डॉ. जाजू यांनी डॉ. काकाणी यंना बोलावून घेतले. डॉ. काकाणी यांनी तपासणी करून रूग्णाची पिशवी वेगळी आहे असे सांगितले. डॉ. उर्मिला जाजू यांना काय झाले आहे असे विचारले असता त्यांनी रूग्णाला औरंगाबाद (Aurangabad) येथे किंवा अंबाजोगाई येथे घेऊन जाण्यास सांगितले. अचानक रूग्णाला कस काय दुसरीकडे नेणार असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच बिल भरून घेऊन रूग्णाला सुट्टी करून नातेवाईकास रूग्णास बाहेर घेऊन जाण्यास सांगितले. आमच्याकडे पर्याय नसल्याने तसेच डॉ. उर्मिला जाजू यांनी काहीही सहकार्य करत नसल्याने सोनाली हिस रुग्णवाहिकेतून डॉ. राजेभोसले यांच्या दवाखान्यात घेऊन जात असतांना वाटेतच प्राण सोडला. मृत सोनाली हिस घेऊन जाजू हॉस्पिटलमध्ये गेलोत व डॉ. उर्मिला जाजू यांना विचारपूस केली असता आम्हाला बोलू दिले नाही. रूग्णावर उपचार केले असे सांगुन उडवा-उडवीची उत्तरे दिली. (Majalgaon)
डॉ. उर्मिला जाजू व डॉ. विजयकुमार जाजू यांचे दवाखान्यात ऑपरेशन थेअटर, भुलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ नसतांना त्यांनी सोनाली पवन गायकवाड (वय २२) हिची प्रसुती केली. दवाखान्यात प्रसुतीसाठी लागणारे कोणतेही सुविधा नसतांना प्रसुतीदरम्यान मातेस किंवा बाळाच्या जीवितास धोका होईल याची जाणीव असतांना देखिल धोकादायक पद्धतीने प्रसुती केली. त्यामुळे तिचा व नवजात बालकाचा मृत्यु झाला असुन या माता व बाळाच्या मृत्युस डॉ. जाजू दाम्पत्य जवाबदार असल्याची फिर्याद मृत सोनालीचे वडील मुकुंद मुंजाबा काळे यांनी दिली. या प्रकरणी डॉ. जाजू दाम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा जीवावर बेतला असुन प्रसुतीदरम्यान मातेसह बाळाचा मृत्यु झाला असे अनेक प्रकार जाजू हॉस्पिटलमध्ये यापूर्वीही झाल्याची माहिती समोर येत आहे. आयुर्वेद तज्ज्ञ असतांना देखील या रूग्णालयामध्ये हजारो गरोदर मातेंच्या प्रसुती केल्या जातात. यावर आरोग्य प्रशासन अंकुश ठेवल्यास आगामी काळात अशा घटना घडणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.