Jalana Lok Sabha 2024 Esakal
मराठवाडा

Jalana Lok Sabha 2024: जालन्यात रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर, की 'मविआ' घेणार विकेट?

Jalana Lok Sabha Election 2024: भाजपकडून १९९९ पासून विजयी होत असलेले रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalana Lok Sabha 2024: जालना मतदारसंघात सहा विधानसभा आहेत. यात जालना काँग्रेस, भोकरदन, बदनापूर भाजप तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण शिंदे गट शिवसेना व फुलंब्रीत भाजपचे वर्चस्व असून येथे या पक्षांचे आमदार आहेत. १९९९ पासून भाजप विजयी होत असून ही काँग्रेसची जागा असतानाही ठाकरे गटाकडून या जागेसाठी प्रयत्न होत आहेत. त्यात काँग्रेसचे डॉ. संजय लाखे पाटील हे शिवसेना (ठाकरे गटात) गेले आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यास डॉ. लाखे पाटील यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते. परंतु, महायुतीचे पारडे जड आहे.

२०१९चे चित्र

रावसाहेब दानवे (भाजप) विजयी

मते : ६,९४,९४५

विलास औताडे (काँग्रेस)

मते : ३,६४,३४८

डॉ. शरदचंद्र वानखेडे (वंचित बहुजन आघाडी)

मते : ७६,९२४

नोटा मते : १५,५५०

विजयी उमेदवारांचे मताधिक्य: ३,३०,५९७

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

मतदारसंघात भाजपचे वर्चस्व, रावसाहेब दानवे सलग पाच वेळा विजयी

महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरे गटात जागेसाठी चढाओढ

भाजपकडून १९९९ पासून विजयी होत असलेले रावसाहेब दानवे यांना उमेदवारी

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होण्याची शक्यता

भाजपसाठी प्रबळ असा मतदारसंघ

जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम शक्य

हे प्रभावी मुद्दे

मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणाचा परिणाम होण्याची शक्यता

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून जालना, भोकरदन, बदनापूर शहरासह ग्रामीण भागात पाणी प्रश्न गंभीर.

सिडको, सिडी पार्क प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT