Maratha Reservation Agitation In Sashtapimpalgaon Jalna 
मराठवाडा

बारामतीला निघण्यापूर्वीच आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात, गेल्या ५६ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू

दिलीप पवार

अंकूशनगर (जि.जालना) : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे ५६ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. येथील आंदोलनकर्त्या महिलांनी  मंगळवारी (ता.१६) पोलिसांच्या काठ्या हिसकावत पोलिसांना घेरावा घातला. दरम्यान मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्यात येणार होती. मात्र बारामतीला निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले  आहे.


मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा आरक्षणासाठी ता.२० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. येथील आंदोलनाला सरकार गांभीर्याने घेत नसल्याने या आंदोलनानी मंगळवारी साष्टपिंपळगाव ते बारामती आरक्षण आक्रोश विनंती रॅली काढण्यात येणार होती. मात्र, मंगळवारी सकाळी साष्टपिंपळगाव येथील मुख्य आंदोलकांना तहसीलदारांच्या आदेशानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.

यात मनोज जरांगे, संजय कटारे, शहादेव औटे, संपत शिंदे, दादासाहेब राक्षे, सुनिल औटे, दादासाहेब बोचरे यांचा समावेश आहे.मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढण्यात येणार होती. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर येथील महिला आंदोलकांनी चक्क पोलिसांच्या काठ्या हिसकावत पोलिसांना घेरावा घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून आंदोलकाना ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपीही येथील महिला आंदोलकांनी केला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT