Jalna Constituency Lok Sabha Election Result  Esakal
मराठवाडा

Jalna Constituency Lok Sabha Election Result : दानवेंचा सिक्सर हुकला! जालन्यात काँग्रेसचे कैलास काळे ठरले जायंट किलर

Jalna Lok Sabha Election Result 2024 congress kalyan kale : जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीची जागाही पूर्वीपासून भाजपची असल्याने भाजपकडून पाचवेळा विजयी झालेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांचा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

जालन्यातील मतदानाचे कल समोर आले आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना मोठा धक्का बसला आहे. सहाव्यांदा खासदार होण्याचं रावसाहेब दानवे यांचं स्वप्न भंगलं आहे. काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे विजयी झाले आहेत.

कल्याण काळे - ६,०७,८९७

रावसाहेब दानवे - ४,९७, ९३९

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,०९.९५८

जालना लोकसभा मतदारसंघातून महायुतीची जागाही पूर्वीपासून भाजपची असल्याने भाजपकडून पाचवेळा विजयी झालेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांचा उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर आघाडीत ही जागा कॉँग्रेसची असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून मागणी केल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जालन्याची जागा काँग्रेसकडे कायम राहिली होती. त्यामुळे काँग्रेसने २००९ मध्ये दानवे यांना कडवी लढत देणारे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती.

या मतदारसंघातून काँग्रेसचा सात वेळा खासदार झाला आहे. त्यानंतर भाजपकडून उत्तमसिंग पवार आणि त्यानंतर सातत्यानं 25 वर्षं रावसाहेब दानवे हेच खासदार राहिले होते. पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण यावेळी या ठिकाणी भाकरी फिरल्याचं चित्र आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

जालना - कैलाश गोरंट्याल (काँग्रेस), बदनापूर - नारायणराव कुचे (भाजप), भोकरदन - संतोष दानवे (भाजप), सिल्लोड - अब्दुल सत्तार (शिवसेना- शिंदे गट), फुलंब्री - हरिभाऊ बागडे (भाजप), पैठण - संदीपान भुमरे (शिवसेना - शिंदे गट

या लोकसभा मतदारसंघात जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण यांचा समावेश होतो. त्यात जालन्याचे कैलाश गोरंट्याल वगळता इतर पाचही आमदार सध्याच्या महायुतीचे आहेत.

जालना मतदारसंघात सहा विधानसभा आहेत. यात जालना काँग्रेस, भोकरदन, बदनापूर भाजप तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, पैठण शिंदे गट शिवसेना व फुलंब्रीत भाजपचे वर्चस्व असून येथे या पक्षांचे आमदार आहेत. १९९९ पासून भाजप विजयी होत असून ही काँग्रेसची जागा असतानाही ठाकरे गटाकडून या जागेसाठी प्रयत्न होत आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघात 69.18 टक्के मतदान

जालना लोकसभा मतदारसंघात 69.18 टक्के मतदान झाले. विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. जालना- एकूण 60.90 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, बदनापूर- एकूण 71.81 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, भोकरदन –एकूण 74.25 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, सिल्लोड – एकूण 68.87 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, फुलंब्री – एकूण 68.80 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, पैठण – एकूण 70.88 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

२०१९चे चित्र

रावसाहेब दानवे (भाजप) विजयी मते : ६,९४,९४५

विलास औताडे (काँग्रेस) मते : ३,६४,३४८

डॉ. शरदचंद्र वानखेडे (वंचित बहुजन आघाडी) मते : ७६,९२४

नोटा मते : १५,५५०

विजयी उमेदवारांचे मताधिक्य: ३,३०,५९७

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : भाजप

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

हे प्रभावी मुद्दे

मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणाचा परिणाम होण्याची शक्यता, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून जालना, भोकरदन, बदनापूर शहरासह ग्रामीण भागात पाणी प्रश्न गंभीर.सिडको, सिडी पार्क प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT