संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

जालन्याचे बिल्डर मुनोतही होते राजेश नहारचे टार्गेट 

सकाळ वृत्तसेवा

जालना - शहरातील मंठा रोडवरील बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या घरावर ता. 21 जुलै रोजी सशस्त्र दरोडा पडला होता; मात्र हा दरोडा नसून गौतम मुनोत यांच्या हत्येचा कट होता, असे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने परतूर येथील व्यापारी राजेश नहार याच्यासह अन्य चार जणांना अटक केली आहे. 

शहरातील बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या घरी ता. 21 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर काही शस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. यात वॉचमनला शस्त्रांचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्यानंतर मुख्य दार तोडून घरात प्रवेश केला; मात्र या आवाजाने श्री. मुनोत यांना जाग आली होती. दरोडेखोर शिरल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना संपर्क केला. त्यानंतर पोलिस निरीक्षक गौर घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते.

पोलिस आल्याचा सुगावा लागल्याने शस्त्रधारी दरोडेखोर पसार झाले होते. दरम्यान, ही घटना म्हणजे दरोडा नव्हता, तर गौतम मुनोत यांची हत्या करण्याचा कट होता, असे पोलिस तपासात आता पुढे आले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या पथकाने सुपारी देणारा व्यापारी संशयित राजेश नहार याच्यासह विनोद सुभाष म्हस्के, पोतू सूर्यकांत अतराम (दोघे रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ), पप्पू ऊर्फ रामभाऊ गायकवाड, दत्ता जाधव यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे राजेश नहार याच्यावर एका व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणात गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणाच्या चौकशीत नहारने यापूर्वी मुनोत यांच्या हत्येची सुपारी दिली होती हे पुढे आले. 

व्हिडिओ पोलिसांच्या हाती 
सुपारी देणारा व्यापारी राजेश नहार आणि सुपारी घेणारा पप्पू ऊर्फ रामभाऊ गायकवाड यांचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये नहार हा पप्पू गायकवाड याला गौतम मुनोत यांची हत्या करण्याबाबत सुपारी देत असल्याचे सांगताना दिसून येते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. 

सुपारी 50 लाखांची 
ही सुपारी 50 लाखांची दिल्याचे व्हिडिओमध्ये नमूद आहे. यात ऍडव्हान्स म्हणून पाच लाख रुपये दिल्याचे सांगितले जात आहे. काम झाल्यानंतर 45 लाख रुपये देण्यात येतील, असे या व्हिडिओमध्ये चित्रित असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

आर्थिक व्यवहारातून प्रकार 
गौतम मुनोत आणि राजेश नहार दोघे व्यवसायात भागीदार होते. आर्थिक व्यवहारातून नहार याने गौतम मुनोत यांच्या हत्येची सुपारी दिली असावी, पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

तीन दिवसांची पोलिस कोठडी 
स्थानिक गुन्हे शाखेने व्यापारी राजेश नहारसह अन्य चार जणांना शुक्रवारी (ता. सहा) न्यायालयात हजर केले. या पाच संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलस कोठडी सुनावली आहे. 

  • - हत्येसाठी दिली होती चौघांना पन्नास लाखांची सुपारी 
  • - गेल्या जुलैमध्ये दरोड्याच्या नावाखाली काढणार होता काटा 
  • - पाच संशयित पकडले 
  • - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT