तलवारी sakal
मराठवाडा

jalna crime news : जालन्यात तलवारीचा साठा जप्त ; दोन संशयित पकडले

जालना शहरात कुरिअरद्वारे तलवारीचा साठा मागवला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू

सकाळ ऑनलाईन टीम

जालना : शहरात कुरिअरद्वारे अवैधरीत्या मागविलेल्या सहा तलवारीच्या साठ्यासह एक खंजीर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह तालुका जालना पोलिसांनी जप्त केला. एका कुरिअरच्या गोदामावर रविवारी (ता. दोन) सायंकाळी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

जालना शहरात कुरिअरद्वारे तलवारीचा साठा मागवला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. राजगुरू यांनी तालुका जालना पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांना या संदर्भात कारवाईचे निर्देश दिले.

त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार तालुका जालना पोलिसांनी जालना-अंबड रोडवरील एका कुरिअर कंपनीच्या गोदामावर रविवारी सायंकाळी छापा टाकला. या गोदामाची झाडाझडती घेतल्यानंतर या ठिकाणी पोलिसांना सहा धारदार तलवारी मिळून आल्या. शिवाय एक खंजीर ही मिळून आला.

त्यानंतर तालुका जालना पोलिसांनी या तलवारी मागवणाऱ्या श्याम सुभाष वांगे (वय २५, रा. संजयनगर, जुना जालना) आणि किशोर माधववाले (वय ३६, रा. बारवाल गल्ली, पानवेल, जालना) या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान कुरिअरद्वारे अजून काही तलवारी शहरात मागवल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत.

दरम्यान ही कारवाई पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांच्यासह तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश खाडे, पोलिस उपनिरीक्षक श्री. राठोड, पोलिस कर्मचारी लक्ष्मण शिंदे, नितीन झोटे, अरुण मुंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT