अंकुशनगर (जि.जालना) : अंकुशनगर परिसरात शुक्रवारी (ता.२५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील मांगणी नदीला पूर आला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीनीत पाणी शिरले आहे.
अंकुशनगर परिसरात शुक्रवारी (ता.२५) जोरदार पाऊस झाला. परिणामी मांगणी नदीला पूर दुथडी वाहू लागली आहे. त्यामुळे नदी शेजारातील शेतांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या भागातील जवळपास एक हजार एकरातील जमीन पाण्यात गेली. पिकांची नासाडी झाले आहे. यात ऊस, कपाशी, सोयाबीन, तूर, बाजरी, फळबाग, सौर पंप ही पाण्याखाली घेतल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. तर मांगणी नदीला पूर आल्याने गोंदी- शहागड रस्ता बंद झाला आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, खरीप पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी गहिनीनाथनगर, मांगणी नदी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान मांगणी नदी ही पैठण तालुक्यातील केकस जळगाव येथून येत असून ही नदी अंबड तालुक्यातील चंदनापूरी, नालेवाडी, कृष्णनगर, गहिनीनाथनगर, पाथरवाला खुर्द, गोंदी येथे गोदावरी नदीला जाऊन मिळते.
(संपादन-प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.