cooton sakal
मराठवाडा

Jalna News : वाढत्या उन्हाचा कपाशीला फटका; पातेगळ पीक पिवळे पडू लागले, विहिरींतही नाही पुरेसे पाणी

परिसरात पावसाअभावी अगोदरच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

टेंभुर्णी - परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याने याचा फटका कपाशी पिकाला बसत आहे. पातेगळसह लहान- लहान कैऱ्यांची देखील गळ होत आहे. तर पावसाअभावी पीक पिवळे पडून नुकसान होत आहे.

परिसरात पावसाअभावी अगोदरच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन फुल अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. दरम्यान शेतकऱ्यांची भिस्त कपाशीवर होती परंतु या पिकालाही उन्हाचा फटका बसत असून मोठ्या प्रमाणावर पातेगळ होत आहे. याशिवाय कपाशीचे हे पीक पिवळे पडत असल्याने मोठे नुकसान होणार आहे.

यासोबतच झाडाला लगडलेल्या लहान-लहान कैऱ्याही गळून पडत आहेत. शेतकऱ्यांच्या सोबत संकटाची मालिका सुरूच असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान विहिरीत असलेले पाणी कपाशीला देऊन पिके जगविण्याची धडपड करताना अनेक शेतकरी दिसत आहे. परंतु महिनाभरापेक्षा जास्त कालावधीत या भागात पाऊसच न झाल्याने नदी-नाले कोरडेठाक आहेत.

यामुळे विहिरीची पाणी पातळी घटली असून अनेकांच्या विहिरीवरील मोटारी तासभरही चालत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

विविध रोगांच्या भक्षस्थानी पडलेले सोयाबीनचे पीक, त्याचा झालेला पाचोळा या पाठोपाठ कपाशीही सुकून जात असल्याने अडचणी वाढल्या आहेत. पावसाअभावी कपाशीचे पीक सुकत असून पातेगळ होऊन कैऱ्याही गळून पडत आहेत.

बालाजी जोशी,

शेतकरी

कपाशीच्या झाडावर जास्त पाते असल्यास काही प्रमाणात पातेगळ होत असते. परंतु मोठ्या प्रमाणावर पातेगळ होत असल्यास शेतकऱ्यांनी प्लॅन ग्रोथ रेगुलेटर या औषधाची फवारणी करावी.

अमोल शिंदे,

तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT