jalna sakal
मराठवाडा

Jalna News : शॉर्टसर्किटमुळे २० एकर ऊस जळाला़; शेतकऱ्यांचे तीस लाखांचे नुकसान

पिंपरखेड गावालगत जायकवाडी डाव्या कालव्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या पिकाला सोमवारी सकाळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

कुंभार पिंपळगाव - पिंपरखेड (ता.घनसावंगी) शिवारात डाव्या कालव्यालगत शेतकऱ्यांच्या उसाला सोमवारी (ता.१६) सकाळी शॉटसर्किटमुळे आग लागली. यात २० एकर ऊस जळाला. सुदैवाने गावकरी, शेतकरी धावल्याने शंभर ते दीडशे एकर ऊसाचे नुकसान टळले.

पिंपरखेड गावालगत जायकवाडी डाव्या कालव्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या पिकाला सोमवारी सकाळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. धुराचे लोट दिसू लागल्याने शेतकरी आणि गावकरी शेताकडे धावले आणि आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला.

आगीत नानासाहेब भोकरे, उत्तमराव भोकरे यांच्या शेतातील दोन एकर, विश्‍वनाथ जायभाये यांच्या शेतातील साडेतीन एकर, लक्ष्मण पवळ यांच्या शेतातील अडीच एकर, नवनाथ पवळ यांच्या शेतातील दोन एकर, संतोष दहिफळे यांच्या शेतातील दोन एकर, सतीश दहिफळे यांच्या शेतातील दोन एकर, वैजनाथ जायभाये यांच्या शेतातील दोन एकर, माणिक दहिफळे यांच्या शेतातील चार एकर असा एकूण २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाला.

तसेच ठिबक सिंचन, पाईप व इतर साहित्य असे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले.

दुष्काळजन्य परिस्थिती असताना या ओढावलेल्या संकटामुळे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT