ST बस sakal
मराठवाडा

Jalna : ST बसच्या प्रवासी संख्येत वाढ ; महिलांना तिकिटात सवलतीचा परिणाम

दररोज १३ ते १४ हजार महिलांचा एसटीने प्रवास, शासनाकडून पन्नास टक्के अनुदान आल्यावर महसुलात पडणार भर

सकाळ वृत्तसेवा

जालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या प्रवास भाड्यात महिलांना ता.१७ मार्चपासून पन्नास टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत प्रतिदिन तब्बल आठ ते नऊ हजारांची वाढ झाली आहे.

मात्र, या सवलतीमुळे महसुलात घट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान महिलांना पन्नास टक्के प्रवास भाड्यातील सवलतीची रक्कम राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून दर महिन्याला पन्नास टक्के अनुदानाची रक्कम आल्यानंतर महामंडळाच्या महसुलात वाढ होणार आहे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जालना विभागात चार आगार असून एकूण २३७ बसगाड्या आहेत. या बसच्या जिल्ह्यासह लांब पल्ल्यांच्या फेऱ्या केल्या जातात. या बस फेऱ्याच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या जालना विभागाला प्रत्येक दिवसाला २२ ते २३ लाखांचा तर प्रत्येक महिन्याला सहा कोटी ६० ते ७० लाखापर्यंत महसूल मिळत होता. याच महसुलातून बसच्या इंधनासाठी खर्च केला जातो.

जिल्ह्यात २३७ बसला महिन्याला सुमारे साडेचार कोटींपेक्षा अधिक महसूल हा डिझेलवर खर्च होतो. तर जिल्ह्यातील चार आगारातील अधिकारी, चालक, वाहक, लिपिक, एसटी दुरुस्ती अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांचा सुमारे साडेचार कोटी रुपयांचा दर महिन्याचा वेतनखर्च वेगळा आहे.

मात्र, राज्य शासनाकडून नागरिकांना एसटी प्रवासात देण्यात येणाऱ्या विविध सवलतींमुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून राहावे लागते. असे असताना राज्य शासनाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासानंतर ता.१७ मार्चपासून महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत लागू केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी भर पडल्याचे चित्र आहे.

पूर्वी जालना विभागात प्रत्येक दिवसाला ५१ ते ५२ हजार प्रवासी एसटीतून प्रवास करत होते. या प्रवासी भाड्यातून एसटीला २२ ते २३ लाखांपर्यंत महसूल मिळत होता. मात्र, महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत लागू केल्यानंतर प्रत्येक दिवसाला ५९ ते ६० हजार प्रवासी एसटीने प्रवास करत आहेत.

यामध्ये १३ ते १४ हजार महिला प्रत्येक दिवसाला एसटीतून प्रवास करत असून मोफत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे आजघडीला एसटीला प्रवासी भाड्यातून प्रत्येक दिवसाला १९ ते २० लाखांचा महसुल मिळत आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्याला एसटीने किती महिलांनी प्रवास केला, याची आकडेवारी एसटी महामंडळाकडून राज्य शासनाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर राज्य शासन महिला प्रवाशांच्या प्रवासाचे पन्नास टक्के अनुदानाची रक्कम महामंडळाला वर्ग करणार आहे.

सवलतीचे पैसे राज्य शासनाकडून

राज्य शासनाने एसटीने ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना पन्नास टक्के, ज्येष्ठ नागरिकांची पन्नास टक्के सवलत, विद्यार्थी, विद्यार्थिंनी प्रवास सवलत जाहीर केली आहे. या सवलतीची रक्कम राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला दिला जाते. त्यामुळे बसचा प्रवास मोफत वाटत असला तरी ही रक्कम राज्यशासन भरत आहे.

विभागातील आगारनिहाय बससंख्यआगार बसगाड्या

  • जालना ७५

  • अंबड ६०

  • जाफराबाद ५५

  • परतूर ४७

  • एकूण २३७

जिल्ह्यातील चार आगारांच्या २३७ बसमधून आजघडीला ५९ ते ६० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. ता.१७ मार्चनंतर सुमारे आठ हजार प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. दररोज जवळपास १३ ते १४ हजार महिला पन्नास टक्के सवलतीवर प्रवास करत आहे. पन्नास टक्के सवलतीची रक्कम राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.

— प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT