jalna talegaon two died after drowning in lake police  sakal
मराठवाडा

Jalna News : जालना जिल्ह्यातील एका तलावात आढळले दोघांचे मृतदेह

गेले होते शेळ्या चारायला; पोहताना मृत्यू झाला की हा घातपात

सकाळ वृत्तसेवा

घनसावंगी : तालुक्यातील तळेगाव येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या किशोरवयीन दोन मुला-मुलीचे शुक्रवारी (ता.२१) सकाळी तलावात मृतदेह आढळले. अभिजित भारत येडे (वय १७) आणि अर्चना संजय भालेराव (१५) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचा पोहताना मृत्यू झाला की हा घातपात आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.

अभिजित आणि अर्चना हे गुरुवारी शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास शेळ्या घरी आल्या. मात्र, दोघे घरी आले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला; पण ते कुठेही आढळून आले नाहीत.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी तलावाच्या शेजारी त्यांचा शोध घेतला. तलावात चपला तरंगताना दिसल्या. त्याच ठिकाणी पाणी पिण्याची बॉटलही दिसून आली. नातेवाइकांनी गळ टाकून शोध घेतल्यावर मृतदेह सापडले. अभिजित दहावीत नापास झाल्याने शाळेत जात नव्हता. अर्चना सातवीत शिकत होती. अंबड पोलिस पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT