Maratha reservation esakal
मराठवाडा

Jalna News : जालन्यातील बारा गावांत मिळाल्या कुणबी मराठा नोंदी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर प्रशासन मराठा आरक्षण देण्याच्या तयारीला लागले आहे.

उमेश वाघमारे

जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर प्रशासन मराठा आरक्षण देण्याच्या तयारीला लागले आहे. सन १३५० ची फसलीपासून (कृषी वर्ष) ते १९५४-५५ पर्यंत सहा तालुक्यामधील बारा गावांमध्ये कुणबी मराठा दस्त नोंदणी प्रशासनाला मिळाली आहे. याचा ६२४ पानांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांकडे दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.

दरम्यान विभागीय आयुक्तांकडून सोमवारी (ता.चार) हा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे किमान मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विदर्भात कुणबी मराठा यांना ओबीसीमधून आरक्षण दिले आहे. हा धागा पकडून गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यासह राज्यभरात मूक, ठोक मोर्चे निघाले. त्याशिवाय अन्य आंदोलनेही झाली. कुणबी मराठा नोंदीचा अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी मुदत मागितली होती. मात्र, ठोस काही होत नसल्याने अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले.

एक सप्टेंबरला आंदोलनाला हिंसक वळण लागले. दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याचा राज्यभर निषेध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन ‘अॅक्टिव्ह मोड’वर आल्याचे दिसते. आरक्षणासंदर्भातील काही बाबींची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे.

अहवाल आज शासनाकडे

सन १३५० ची फसलीपासून (कृषी वर्ष) १९५४-५५ पर्यंत जिल्ह्यातील बारा गावांमध्ये कुणबी मराठा नोंदी आढळल्या आहेत. यासंदर्भातील ६२४ पानांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. शिवाय विभागीय आयुक्तांनी रविवारी (ता.तीन) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भेट घेऊन यासंदर्भात त्यांना माहिती दिली आहे.

हा ६२४ पानांचा अहवाल सोमवारी (ता.चार) राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. याशिवाय मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत अशा नोंदी आहेत का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या प्रश्नांमुळे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

१९५४-५५ पर्यंत नोंद मिळाल्या

कुणबी मराठा नोंदी १९५४-५५ पर्यंत मिळाल्या आहेत. यात जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा येथे निजामकालीन नोंद १९५१-५२ ची आहे. बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथील १९५२-५३, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथील नोंदी १९५४-५५ वर्षातील आहेत.

अन्य जिल्ह्यांत नोंदीची चाचपणी

जालन्याप्रमाणे मराठवाड्यातील इतर सात जिल्ह्यांतही पूर्वीची कुणबी मराठा नोंदीचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जुने रेकॉर्ड तपासले जात आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांत याप्रमाणे नोंदी आढळल्यास विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो.

या बारा गावांत आढळल्या नोंदी

जिल्ह्यात सहा तालुक्यांमधील बारा गावांमध्ये कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी, रवना, वडीरामसगाव, जाफराबाद तालुक्यातील मेरखेडा, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, बदनापूर तालुक्यात किन्होळा, अंबड तालुक्यातील दहीपुरी, दाढेगाव, बारसवाडा, जालना तालुक्यातील वस्तीगव्हाण (मोतीगव्हाण) निरखेडा, धांडेगाव या गावांचा समावेश आहे. या गावांची अहवालात नोंद आहे.

सन १३५० ची फसलीपासून नोंदणी

जिल्ह्यात सन १३५० ची (कृषी वर्ष) फलसीपासून कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत. यात अंबड तालुक्यातील दहीपुरी, दाढेगाव, बारसवाडा या तीन गावांचा समावेश आहे. जालना तालुक्यातील तीन गावांच्या नोंदणी वर्षाचा उल्लेख मिळालेला नाही. शिवाय घनसावंगी तालुक्यातील गावांचा दस्तऐवजाचे नोंदणी वर्ष निरंक दाखविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT