Jalna Reshim Udyog News: कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील अनेक शेतकरी रेशीम शेती करून भरघोस उत्पन्न कमवत आहेत. रेशीम शेतीमुळे येथील शेतकरी लखपती बनले आहेत.
भोकरदन तालुक्यातील वालसा डावरगाव येथील शेतकरी शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायावर भर देतात. बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांना शेतीतून जेमतेम उत्पन्न मिळते. या परिस्थितीवर येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळाले. रेशीम विकास कार्यालयाला भेट देऊन त्यांनी संपूर्ण माहिती घेत रेशीम शेतीकडे वळाले.
कमी पाण्यात हे पीक येते. शिवाय यावर कोणतीही कीड-रोग मोठ्या प्रमाणात नुकसान करत नाही. कोणत्याही किटक नाशकाची फवारणी करण्याची आवश्यकता नाही. शिवाय वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम होत नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम विकास योजनेचा अंतर्भाव करण्यात आला आहे.(Latest Marathi News)
या योजने अंतर्गत वर्गवारीनुसार व अल्पभूधारक शेतकऱ्यास तुती लागवड, किटक संगोपनगृह उभारणी व संगोपन कामकाजाकरिता तीन वर्षांत तीन लाख ३९ हजार ५०० रुपयांचा कुशल व अकुशल अनुदान देण्यात येते. (Marathi Tajya Batmya)
यामुळे शेतकऱ्यांना आपल्याच शेतामध्ये आपले उत्पादन वाढविण्याकरिता केलेले तुती लागवड व किटक संगोपनाचे कामाचे अनुदान मिळत असल्याने येथील शेतकरी सधन झाले आहेत.
गावातील ३२ जणांची रेशीम शेती
वालसा डावरगाव आजघडीला मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम शेतीकडे वळाले आहे. या एकट्या गावात सुमारे ३२ शेतकरी रेशीमची शेती करीत आहेत. रेशीम शेतीतून या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवाय गाव समृद्धीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
रेशीम शेतीत एकरी एक लाख ८४ हजार ३७० अकुशलसाठी व एक लाख लाख दहा हजार ७८० कुशलसाठी असे एकूण दोन लाख लाख ९५ हजार १५० रुपयांचे अनुदान एकरी तीन वर्षासाठी मंजूर केले.
पहिल्या वर्षी केवळ दोन वेळा कोष उत्पादन घेण्यात आले. पहिल्या वेळी ३५ किलो तर दुसऱ्या वेळी १०० किलो असे एकूण १३५ किलो कोष उत्पादन घेण्यात आले.
दुसऱ्या वर्षी ४५० किलो कोष उत्पादनातून दोन लाख ३५ हजार तर तिसऱ्या वर्षी ८०० किलो कोषातून पाच लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. प्रत्येक वेळी कोष उत्पादन घेण्यासाठी साधारणत: सात ते दहा हजार इतका खर्च येतो.
— बबन साबळे,शेतकरी, वालसा डावरगाव,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.