पैठण - येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातील पाणीसाठा बुधवारी (ता. ७) २५ टक्क्यांवर पोचला. सध्या १९ हजार ६०९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.
धरणाच्या पाणीपातळी फुटामध्ये १५०४.५०, तर मीटरमध्ये ४५८.५०० असून एकूण पाणीसाठा १२७५ दशलक्ष घनमीटर, जिवंत पाणीसाठा ५३६.५३७ दशलक्ष घनमीटर आहे. काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात, विशेषतः नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली.
एक टक्क्याने पाणीपातळी वाढीची झालेली सुरुवात बघता बघता चार दिवसांत २५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सारंग चव्हाण यांनी धरणाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी धरण नियंत्रण कक्षातील जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना माहिती दिली.
नगर जिल्ह्यातून विसर्ग
नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो ‘जायकवाडी’त येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने आवक आता कमी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने तेथून पाण्याची आवक काहीशी कमी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.