Jewali Earthquake 1993 sakal
मराठवाडा

Jewali Earthquake 1993 : प्रलयकारी भूकंपानंतर अद्याप ‘बत्ती गुल’च; ३१ वर्षांनंतरही गावच्या समस्या कायम

मोठी जीवित व वित्तहानी करणाऱ्या १९९३ च्या भूकंपाला आज ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही या प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी नागरिकांच्या मनात कायम आहेत.

सुधीर कोरे

जेवळी : मोठी जीवित व वित्तहानी करणाऱ्या १९९३ च्या भूकंपाला आज ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही या प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी नागरिकांच्या मनात कायम आहेत. या भूकंपात जेवळी (ता. लोहारा) गावात मोठ्या प्रमाणात वित्तहानीबरोबरच येथील ३४ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

भूकंपानंतर शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने जवळपास १६ कोटी खर्चून भूकंपरोधक पद्धतीचा वापर करीत मास्टर प्लॅननुसार गावचे पुनर्वसन केले. परंतु या गावाकडे बघितल्यानंतर ३१ वर्षांनंतरही गावच्या समस्या कायम आहेत.

काही ठिकाणी तर पोल व वीजवाहिनी टाकली नसल्याने येथील काही घरात अद्याप वीज पोचलीच नाही. तर पुनर्वसनासाठी ज्यांनी जमिनी दिल्या, त्यापैकी एकालाही पूर्ण मावेजा अद्याप मिळालेला नाही. एकतीस वर्षांनंतरही गावापासून शिवारात जाण्यासाठी शेत रस्ते निर्माण झाले नसल्याने शेती कसणे अडचणीचे झाले आहे.

तसेच योग्य देखभाल दुरुस्तीअभावी येथील पुनर्वसनात निर्माण झालेल्या बहुउद्देशीय इमारती, गटारी, रस्ते आदींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथील १०८ कुटुंबांना तर कायदेशीर कागदपत्रे देऊनही घरे मिळत नसल्याने ही कुटुंबे अद्यापही बेघर आहेत.

अनेक दिवसांच्या मागणीनंतर आता येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दुसरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या कामाला सुरवात झाली आहे. परंतु, या योजनेच्या कामाचा वेग हा संथ असून ही योजना अद्याप कार्यान्वित झाली नाही. किल्लारी, सास्तूरप्रमाणे येथेही व्यापाऱ्यांना गाळे बांधून द्यावे यासाठी १६५ दुकान मालक योग्य कागदपत्रांसह शासनाकडे मागणी व पाठपुरावा करीत आहेत; परंतु अद्यापपर्यंत यावर निर्णय झाला नाही.

जेवळी हे लोकसंख्येने लोहारा तालुक्यातील सर्वांत मोठे गाव. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून शिक्षण संस्था कार्यरत असल्याने येथे नोकरदारांचे प्रमाण अधिक आहे. येथील शिवार काळ्या मातीचे कसदार असल्याने हे गाव या भागात एक सधन गाव म्हणून ओळखले जात होते.

त्या अनुषंगाने गावात मोठ्या प्रमाणात दगडी चिरेबंद बांधकाम असलेली घरे, वाडे अस्तित्वात होते. परंतु, या विनाशकारी भूकंपात हे चिरेबंदी वाडे जमीनदोस्त झाले. यात जेवळी येथील ३४ नागरिकांचा मृत्यू झाला तर जवळपास ८० टक्के गाव बेचिराख झाले होते. क्षणात होत्याचे नव्हते झाले. यात हावळे यांच्या कुटुंबातील ८, कारभारी कुटुंबातील ४ व घोडके या कुटुंबातील ४ व्यक्तींचा मृत्यू झाला.

या भूकंपानंतर देश - विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला. येथील नुकसान पाहून शासनाने या गावचे नव्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला पुनर्वसनासाठी गावकऱ्यांनी समिती स्थापन केली. त्यांना मोठा संघर्षही करावा लागला.

नव्या ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या निर्णयानंतर मात्र, येथे पुनर्वसन दोन ठिकाणी करावे अशी मागणी होऊ लागली. यासाठी शेतीचे अंतर पुढे करण्यात आले. परंतु, यात वैयक्तिक हेवेदावे व राजकारणाचा भाग यात अधिक होता.

या वादात दीड-दोन वर्षे पुनर्वसन रखडले. शेवटी जेवळी गावचे जेवळी उत्तर, जेवळी दक्षिण, जेवळी पूर्वतांडा, जेवळी पश्चिम तांडा व रुद्रवाडी असे पाच ठिकाणी पुनर्वसनाचे निर्णय झाले. जेवळी उत्तर या मोठ्या वस्तीतच बहुतांश शासकीय कार्यालये निर्माण झाली. शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीद्वारे जवळपास १६ कोटी खर्चून भूकंपरोधक पद्धतीचा वापर करत मास्टर प्लॅननुसार गावचे पुनर्वसन केले आहे.

जुने जेवळी गाव जवळपास २५ हेक्टरमध्ये वसलेले होते. आता नवीन गाव हे ८७ हेक्टरांत असून १ हजार ९८२ घरे बांधण्यात आली आहेत. पूर्वी एकमेकाला खेटून असलेली ही घरे आता सुटसुटीत व टुमदार आहेत.

गावात आवश्यकतेनुसार मुख्य रस्ते बारा मीटर, नऊ मीटर, तीन मीटर रुंदीचे असे एकूण चौदा किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. दोन्ही बाजूंनी गटारी निर्माण केल्या आहेत. मध्यवर्ती ठिकणी बाजाराची सोय व दुकान तसेच शासकीय व बहुउद्देशीय इमारत बांधण्यात आली आहे.

पाणीपुरवठा योजना सुरवातीपासूनच बंद

येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सात कोटी ३० लाख रुपये खर्चून राबविण्यात आलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सदोष व निकृष्ट झाल्याने ही योजना सुरवातीपासूनच बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

SCROLL FOR NEXT