हिंगोली : येथील सराफा, सुवर्णकार असोसिएशनच्या (Jewellers Association) वतीने हॉलमार्किग युनिक आयडी जाचक कायद्याविरोधात सोमवारी (ता.२३) एकदिवसीय बंद पुकारुन जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेशआप्पा सराफ, शहराध्यक्ष साईनाथ उदावंत, उपाध्यक्ष किशोर सोनी, इंदरचंद जैन, चंद्रकांतआप्पा सराफ, जयेश खर्जुले, मंगेश लोलगे, विनोद खर्जुले, कृष्णा ढोके, गजानन रत्नपारखी, राजू साखरकर, देवानंद साखरकर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने हॉलमार्किग युनिक (Hingoli) आयडद्वारे शुद्धता तपासणी पद्धतीमध्ये केलेल्या चुकीच्या व असंविधानिक बदलाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील सराफा व सुवर्णकार व्यावसायिकांनी आज सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे.
यात हिंगोली येथील सराफ व सुवर्णकार हे देखील सहभागी झाले आहेत. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने शुद्धतेचा स्टॅम्प दागिन्यांवर मारण्यासाठी हॉलमार्किग कायदा अंमलात आणला. देशातील ज्वेलर्सने कायद्याचे स्वागतच केले.आतापर्यंत त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली नाही व बीआयएसने शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यांमध्ये बदल करीत हॉलमार्किग युनिक आयडीद्वारे शुद्धता तपासणीची चुकीची व असंविधानिक पद्धत आणली. इतकेच नव्हे, तर ही आणत असताना सुवर्णकारांच्या शिखर संस्थाला विश्वासात घेतले नाही. येणाऱ्या अडचणींवर चर्चा न करता बदल करण्यात आले. सदर पद्धतीमुळे ग्राहकांवर खर्चाचा अतिरिक्त भार पडणार आहे आणि व्यापाऱ्यांनाही पेपर वर्क वाढल्याचा त्रास होणार आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी भारत बंद ठेवण्यात आला असून हा कायदा रद्द नाही झाला तर संपूर्ण भारतातील सराफ व सुवर्णकार बाजार बेमुदत बंद पुकारण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.