jijau multistate society investor finance fraud forward to sit police beed crime sakal
मराठवाडा

Beed Crime : जिजाऊ मल्टिस्टेट घोटाळ्याचा तपास एसआयटीकडे

‘सकाळ’च्या बातमीची पोलिस अधीक्षकांकडून दखल ः पंकज कुमावत यांच्याकडे तपास

सकाळ वृत्तसेवा

बीड : ठेवीदारांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या येथील जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट को - ऑप. क्रेडीट सोसायटीच्या गुन्ह्याचा तपास अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून काढून विशेष तपास पथकाकडे देण्यात आला.

पोलिस अधीक्षक नंकदुमार ठाकूर यांनी गुरुवारी (ता. २०) हे आदेश काढले. तपासाची सूत्रे केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे असतील. या प्रकरणात आतापर्यंत तीन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात दाखल झालेल्या विविध आर्थिक फसवणुकींच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने एकही प्रकरणात फसवणूक झालेल्यांना पैसे मिळवून दिले नाहीत. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपींचा या शाखेशी संबंध येतो.

त्यामुळे जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट को - ऑफ क्रेडीट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणाचा तपास देखील ‘आर्थिक गुन्हे शाखेसाठी एक संधीच’ असून पूर्वानुभव पाहता ‘आर्थिक‘कडून ठेवीदारांना रक्कम अशक्यच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून यापूर्वीच्या विविध गुन्ह्यांचा दाखले दिले होते.

याची दखल पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेतली आणि या शाखेकडून हा तपास आता विशेष पथकाद्वारे निश्चित केला. जिजाऊ मॉंसाहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी सुरुवातीला शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

आता याचा तपास सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक भारत बरडे, अंमलदार मुकुंद तांदळे,

अभिमान भालेराव, श्रीकृष्ण हुरकुडे, भाऊसाहेब चव्हाण, संजय पवार करतील. या प्रकरणातील मल्टीस्टेटच्या अध्यक्षा अनिता शिंदे न्यायालयीन कोठडीत तर योगेश करांडे पोलिस कोठडीत आहे.

जिल्ह्यात अलीकडच्या काळात मंत्री बँक, परिवर्तन मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट, डॉक्टरची कर्जासाठी कोट्यवधींची फसवणूक, केबीसी घोटाळा असे अनेक गुन्हे दाखल झाले. कोटींच्या पुढे तपास असल्याने सहाजिकच हा तपास आर्थिक गुन्हे शाखांकडे वर्ग झाला.

मात्र, ठेवीदारांच्या हाती कवड्याही पडलेल्या नाहीत. त्यामुळे ‘सकाळ’सह ठेवीदारांनी मोर्चा काढून हा तपास विशेष पथकाद्वारे करावा अशी मागणी केली होती.

तिसरा गुन्हा दाखल

यापूर्वी जिजाऊ मल्टीस्टेट को - ऑप. क्रेडीट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणी शिवाजी नगर, नेकनूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. तिसरा गुन्हा वाशी (जि. धाराशिव) पोलिस ठाण्यात गुरुवारी दाखल झाला. अनिता बबन शिंदे, बबन विश्वनाथ शिंदे, मनिष बबन शिंदे, योगेश करांडे, अश्विनी सुनील वांढरे, अशोक गोविंद लवांडे, शिवराज शषिकांत बिरबले, शंकर भास्कर हाडुळे, अमोल नामदेव पवार आदींचा आरोपींमध्ये समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT