Archana Ghule Sakal
मराठवाडा

Jintur News : धक्कादायक घटना! भाऊबिजेच्या दिवशीच बहिणीने घेतला गळफास

जिंतूर शहरातील हुतात्मा स्मारक भागात एका ३५ वर्षीय बहिणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली.

राजाभाऊ नगरकर

जिंतूर - बुधवारी (ता. १५) सर्वत्र बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण भाऊबीज आनंदी वातावरणात साजरा होत असतानाच शहरातील हुतात्मा स्मारक भागात एका ३५ वर्षीय बहिणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना रात्री दहाच्या सुमारास समोर आली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. अर्चना घुले असे आत्महत्याग्रस्त बहिणीचे नाव आहे. पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील हुतात्मा स्मारक भागात नरहरी घुले व त्यांची पत्नी अर्चना घुले हे दाम्पत्य आपल्या दोन मुलींसह राहतात. घटनेच्या दिवशी भाऊबीजेच्या सणाचे जेवण झाल्यावर अर्चना यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास घरातील छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतला.

घरच्यांना लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले.मात्र तत्पूर्वीच अर्चना घुले यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांची एक मुलगी अपंग मुलगी असल्यामुळे त्या नेहमी मानसिक तणावात असल्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयात पोलीस कॉन्स्टेबल लीला जोगदंड यांनी पंचनामा केला असून घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान ऐन भाऊबीजेच्या दिवशीच विवाहितेने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अर्चना घुले यांच्या पश्चात पती दोन मुली असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'हे इथे चालणार नाही..' अजित पवार कडाडले, योगींना दिलं रोखठोक प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates : फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट सर्वात जास्त महाराष्ट्र मध्ये झाली - नरेंद्र मोदी

सुरज चव्हाण नेमकं कुणाच्या सांगण्याप्रमाणे वागतोय? अंकिताच्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनाही पडला प्रश्न, म्हणाले- त्याच्या आजूबाजूला

Beed Assembly Election 2024 : ‘आरक्षणाची लढाई लढले नाही, तर विनायकरावांचे नाव लावणार नाही’

CM Eknath Shinde: ''एक हैं तो सेफ हैं! पंतप्रधानांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ घेतला'' मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला अर्थामागचा अर्थ

SCROLL FOR NEXT