नांदेड : शेतीच्या पिककर्जासाठी व पाइपलाईन, ठिबक अथवा शेतीच्या अन्य इतर कामांसाठी राष्ट्रीयकृत बॅंकांकडून कर्ज काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आजही बॅंकांकडून कोणतेच कर्जमाफ झालेले नाही. कारण काय तर जमिनीच्या हेक्टरची मर्यादा किंवा बॅंकांनी अगोदर राबविलेले चुकीचे धोरण यामुळे हे असे अनेक शेतकरी गेल्या वीस वर्षांपासून कर्जमाफीपासून वंचित ठरले आहेत.
शेतकरी गुरफटला कर्जमाफीत
बॅंका कर्ज देत नसल्याने या शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळी खासगी सावकारांचे दरवाजे ठोठावण्याशिवाय पर्याय नसल्याने अशा शेतकऱ्यांचा शेतीतील नफा हा शून्यावर आल्याचे खरे वास्तव आहे. १९८०मध्ये सर्वप्रथम ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले व तेव्हापासून कर्जमाफ होते, या आशेने शेतकरी कर्जमाफीत गुरफटले गेले आहेत. एकविसाव्या शतकात २००८ मध्ये केंद्रात शरद पवार कृषिमंत्री असताना अशीच काहीशी भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली.
हेही वाचाच - ....म्हणून मराठवाड्यात रेल्वेने प्रवास करताना घाबरतात प्रवाशी ः कारण वाचून तुम्हीही प्रवास टाळाल
कर्जमाफीत सरसकट निकष
आतापर्यंत झालेल्या सर्वच कर्जमाफीत सरसकटमध्ये निकष टाकले गेल्याने प्रत्येक वेळेस काहीना काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित ठरत आले आहेत. त्यात दोन हेक्टरची मर्यादा असेल किंवा रकमेची सोबतच बॅंकांची चलाखी असेल या ना त्या कारणाने आतापर्यंत कर्जमाफीपासून सुटलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज हे आजरोजी कितीतरी पटीत वाढले असून, ते कर्ज त्यांना भरणे शक्य नाही हे शासनाला व बॅंकांनाही ठाऊक आहे. पुन्हा कर्ज मागू नये ही त्यांची भूमिका ठाम झाल्याचे यावरून दिसून येत आहे.
लाखो शेतकरी अडकले
खातेदार शेतकऱ्यांना एनपीएत कन्व्हर्ट करून त्यांचे दरवाजे शासनाने बंद करून खासगी सावकारीच्या बाहुपाशात ढकलून दिले आहे. गेल्या वीस वर्षांपासून असे राज्यात लाखो शेतकरी अडकले असून ते कोणत्याच कर्जमाफीत बसणार नाहीत, याची जणू तजवीज करून ठेवली आहे.
शेतकऱ्यांची अवस्था दयनीय
शेतकऱ्यांसाठी फक्त तडजोड नावाचे औषध तयार ठेऊन बॅंका असल्या तरी या तडजोडीतही अनेक शेतकरी बसण्याच्या मनःस्थितीत नाही. कारण बॅंका तडजोड करून पुन्हा कर्ज देत नसल्याने खरे तर शेतकऱ्यांची अवस्था ही दयनीय होत असल्याचे वास्तव आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.