karishma nayar inspiring story rank 14 in upsc exam beed Sakal
मराठवाडा

Motivation Story : नावातच नव्हे, यूपीएससीतही दाखविला ‘करिष्मा’; नायर यांची यशकथा, दुसऱ्याच प्रयत्नात देशात १४ वा रँक

देशात १४ रँक मिळविणाऱ्या करिष्मा नायर यांनी भारतीय प्रशासन सेवेत महाराष्ट्र केडर निवडले आहे.

दत्ता देशमुख

Beed News : उच्चशिक्षीत व नोकरदार कुटुंबातील करिष्मा नायर पदवीच्या दुसऱ्या वर्षात असताना त्यांना भारतीय प्रशासन सेवेबद्दल वाचण्यात आले. त्यांनाही वाटले आपणही आयएएस व्हायचे. आयएस परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्या.

पण, पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. योगायोगाने कोरोना संसर्गाची सुरुवात झाल्याने त्यांना परत मुंबईला यावे लागल्याने स्वत:च अभ्यास केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

देशात १४ रँक मिळविणाऱ्या करिष्मा नायर यांनी भारतीय प्रशासन सेवेत महाराष्ट्र केडर निवडले आहे. सध्या त्या सहायक जिल्हाधिकारी म्हणून बीडच्या उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

मुळच्या केरळ राज्यातील पालक्कड येथील रहिवासी असलेल्या करिष्मा नायर यांचे वडील पी. व्ही. नंदकुमार मुंबईत बँक अधिकारी व आई गिता नंदकुमार या शिक्षिका आहे. तर, त्यांची मोठी बहिण कार्तिक फेसबुकमध्ये नोकरीला आहे.

नोकरीनिमित्त त्यांचे कुटुंबीय मुंबईतच स्थायिक आहे. केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतलेल्या करिष्मा नायर यांना दहावीत देखील एक प्लस प्लस ग्रेड मिळाला. १२ वी विज्ञानमध्ये ९२.८ टक्के गुण मिळविलेल्या करिष्मा नायर यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्समधून विशेष प्राविण्यासह पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली.

दरम्यान, एक वर्षे मसूरी येथे भारतीय प्रशासन सेवेचे प्रशिक्षण केल्यानंतर त्यांची सिंधूदुर्ग जिल्ह्यात परिविक्षाधिन कालावधीसाठी निवड झाली. त्यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी आदी पदांवर काम केले. महिनाभरापूर्वी त्या सहायक जिल्हाधिकारी म्हणून बीडच्या उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

बॅडमिंटन खेळाडू, वादविवाद स्पर्धांत सहभाग

बॅडमिंटन खेळाची आवड असलेल्या करिष्मा नायर महाविद्यालयीन काळात वाद- विवाद स्पर्धांतही सहभागी घेत. अंतर महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरीय स्पर्धांत त्यांनी बक्षीसेही मिळविली आहेत.

दुसऱ्याच प्रयत्नात घवघवीत यश

नायर यांनी पदवी उत्तीर्ण होताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली गाठली. २०१९ साली त्यांनी प्रथम परीक्षा दिली. मुलाखतीपर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र, यश आले नाही. योगायोगाने लॉकडाऊनमुळे त्यांना परत मुंबईला यावे लागले.

मुंबईत त्यांनी स्वत:च पुन्हा अभ्यास केला. २०२० साली दिलेल्या परीक्षेत त्यांनी देशात १४ वा रँक मिळविला. त्यांची भारतीय प्रशासन सेवेसाठी निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र केडर निवडले. दरम्यान, आपण भारतीय प्रशासन सेवेत निवडीसाठी केवळ दोन परीक्षा देण्याचे ठरविले होते. दुसऱ्या परीक्षेत अपयश आले असते तर फॉरेन्सिक सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी करणार होते, असे करिष्मा नायर सांगतात.

महिला सक्षमच असल्याचा अनुभव आपण शिक्षण काळात व परिविक्षाधिन काळात घेतला आहे. महिलांमध्ये अधिक आत्मविश्वास व समाज आणि कुटुंबातून त्यांना पाठबळ व प्रोत्साहन मिळाले तर त्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात.

— करिष्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT