karnataka State transport bus set fire on national highway in Turori maratha reservation Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : तुरोरीत राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसला लावली आग

अविनाश काळे

उमरगा : मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरु असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तालुक्यातील तुरोरी गावात सोमवारी (ता. ३०) रात्री साडे आठच्या दरम्यान कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बस अनोळखी व्यक्तींनी पेटवुन दिली.

बिदर जिल्ह्यातील भालकी येथून पुणे जाण्यासाठी निघालेली बस तुरोरीत आली असता कांही लोकांनी नियोजन करुन बसचे (क्र. केए ३८ एफ १२०१) चालक अनिलकुमार बिरादार व वाहक राजकुमार शिंदे यांच्यासह ३९ प्रवाशांना खाली उतरवले. 

त्यानंतर बसच्या काचा फोडण्यात आल्या, बसच्या टाकीतील दोन s डिझेल काढून ते बसवर घालून बस पेटवून देण्यात आली. घटना घडल्यानंतर अर्धा तासाने पोलिस घटनास्थळी पोहचले. उमरगा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी यंत्रणा सुरू केली.

दरम्यान बसला आग लावल्याच्या घटनेमुळे पोलिसांनी हैद्राबादहुन उमरग्याकडे येणाऱ्या व सोलापूरहुन हैद्राबादला जाणाऱ्या बस आहे त्या ठिकाणच्या आगारात थांबवण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सोमवारी रात्री उमरगा बसस्थानकात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. हैद्राबादला जाण्यासाठी खासगी जीपसाठी प्रवाशांना प्रत्येकी सातशे रूपये मोजावे लागले. पोलिस निरीक्षक डी.बी. पारेकर,  आगारप्रमुख प्रसाद कुलकर्णी यांच्या समन्वयातुन रात्री बसच्या सुरक्षिततेसाठी नियोजन करण्यात आले.

अन् संचारबंदी लागू झाली !

उमरग्यासह ग्रामीण भागात सर्व कांही शांततेत आंदोलन सुरु असताना बसला आग लावल्याच्या घटनेमुळे आणि येडशीसह अन्य भागात होणाऱ्या रास्ता रोको आंदोलन व बीड घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता म्हणुन संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.

बाजारपेठ दुपारी बाराला झाली बंद

जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी संचारबंदीचे आदेश लागू केल्यामुळे उमरग्यातील बाजारपेठ बंद बाबत संभ्रवस्था होती. सकाळपासुन बाजारपेठेतील बरीच दुकाने सुरु होती.. सकल मराठा समाजाची बाजारपेठ बंदसाठी सहमती नव्हती, संयम व शांततेत सर्व व्यवहार सुरु असावेत असे संकेत मिळाल्यामुळे व्यापारी महासंघाने बंदचा निर्णय घेतला नव्हता.

परंतु पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर यांनी संचारबंदीमुळे आस्थापने बंद ठेवावे लागतील, अशी भूमिका घेतल्याने पोलिस ठाण्यात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उपाध्यक्ष प्रदिप चालुक्य, सचिव शिवप्रसाद लड्डा, कार्याध्यक्ष नितीन होळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

त्यात जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरल्याने दुपारी बारानंतर दुकाने बंद करण्यात आली. " सकल मराठा बांधव व व्यापारी बांधव आम्ही समन्वयातुन काम करण्यास तयार आहोत, सध्या दिवाळी सणानिमित्त व्यापाऱ्यांनी लाखो रुपयाची गुंतवणूक केली आहे. प्रशासनाने स्थानिक पातळीवरच्या निर्णयासाठी सहमती देण्याची गरज असल्याचे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे यांनी सांगितले.

आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन

सकल मराठा समाजाच्या वतीने २८ ऑक्टोबरपासुन उमरग्यात शांततेत साखळी उपोषण सुरू आहे तर याच ठिकाणी आण्णासाहेब पवार यांचे आमरण उपोषण सुरु आहे, याशिवाय कदेर, कोराळ, मुरुम, गुंजोटी येथेही उपोषण सुरू आहे.

अत्यंद शांततेने सुरु असलेल्या आंदोलनाला बस पेटवल्याने गालबोट लागले, परंतु त्या घटनेशी सकल मराठा समाजाने संबंध नसल्याचे सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आंदोलन सुरु असुन सर्वांनी संयमाने यात सहभागी व्हावे, शांततेत आंदोलन करावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT