Pankaja Munde sakal
मराठवाडा

Pankaja Munde : भा.ज.पा. राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंढे यांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन, शिवशक्ती परिक्रमा याञेचा शुभारंभ

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंढे यांनी शिवशक्ती परिक्रमा याञा सुरु केली.

सकाळ वृत्तसेवा

Khulatabad News - भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंढे यांनी शिवशक्ती परिक्रमा याञा सुरु केली असुन, याचाच भाग म्हणुन त्यांनी सोमवारी (ता. चार) वेरुळ (ता. खुलताबाद) येथील 12 वे ज्योतिर्लिंग श्री. घृष्णेश्वराची विधिवत पुजा, अभिषेक करुन दर्शन घेतले.

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पंकजाताई मुंढे यांनी चार ते 11 सप्टेंबर दरम्यान शिवशक्ती परिक्रमा याञा आयोजित केली असुन, या दरम्यान त्या महाराष्ट्रातील त्यांच्या मतदारसंघातील परळी वैजनाथ सह, औंढा नागनाथ, श्री. ञ्यंबकेश्वर, भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणार आहे.

या शिवशक्ती परिक्रमा याञेची सुरुवात वेरुळ (ता. खुलताबाद) येथील 12 वे ज्योतिर्लिंग श्री. घृष्णेश्वर चरणी दर्शन घेवुन केली असल्याचं मंदिर परिसरात पञकारांशी बोलतांना नमुद केलं, योगायोगाने प. पु. भगवान बाबा यांची देखील आज जयंती असुन, या परिक्रमा याञेस सुरुवात केली, जन आशीर्वाद,जन संपर्क हाच यातला मुख्य उद्देश असल्याचं स्पष्ट केलं.

या वेळी राष्ट्रीय महासचिव मुंढे यांच्या समवेत, प्रवीण घुगे, भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष (दक्षिण) संजय खंबायते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

स्व.गोपीनाथ मुंढे यांची या निमित्ताने आठवण ताजी झाली, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असतांना परळी वैजनाथ ते घृष्णेश्वर अशी शेतकरी संघर्ष याञा काढली होती, समारोप घृष्णेश्वर चरणी करण्यात आल्यानंतर वेरुळ गांवात सभा घेण्यात आली होती.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kothrud Assembly Election : चंद्रकांत पाटीलांचा जीव भांड्यात! बंडखोराने घेतली माघार, पेढा भरवून केलं मनोमिलन

Imperial Blue: भारतातील मोठा व्हिस्की ब्रँड विकला जाणार; दोन कंपन्या खरेदीच्या शर्यतीत, कोण आहे आघाडीवर?

मेरे करण अर्जुन आएंगे नही, आगये! थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार शाहरुख सलमानचा 'करण-अर्जुन'; वाचा तारीख

तुमको कुछ नहीं पता है! पत्नी साक्षीसमोर MS Dhoniचंही नाही चालत;'कॅप्टन कूल'नं सांगितला भन्नाट किस्सा, Video Viral

Latest Maharashtra News Updates : आमदार चेतन तुपे भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT