beed sakal
मराठवाडा

Beed Crime : पंधरवड्याच्या मुक्कामानंतर अपहरणाचा कट ; उद्योजक कुटेंच्या नातेवाईकाचे अपहरण प्रकरण: आमिष, धमकी अन् मग खंडणी

बीड येथील द कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकिय संचालिका अर्चना कुटे यांचे भाऊ व या समुहाचे प्रमुख सुरेश कुटे यांचे मेहुणे शिवाजी घरत यांच्या अपहरण प्रकरणात नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी कोठडीत असलेली पुजा देशभ्रतार ही या घटनेच्या पूर्वी पंधरवाडा शहरात मुक्काम ठोकून होती.

प्रशांत पाटील

बीड : येथील द कुटे ग्रुपच्या व्यवस्थापकिय संचालिका अर्चना कुटे यांचे भाऊ व या समुहाचे प्रमुख सुरेश कुटे यांचे मेहुणे शिवाजी घरत यांच्या अपहरण प्रकरणात नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी कोठडीत असलेली पुजा देशभ्रतार ही या घटनेच्या पूर्वी पंधरवाडा शहरात मुक्काम ठोकून होती. अगोदर लालच मग धमक्या आणि मग अपहरण असे हे नाट्य घडले आहे. या प्रकरणी पुजा एस. देशभ्रतार हीच्यासह अन्य १३ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

गुरुवारी (ता. २५) दुपारी शहरातील जालना रोडवरील यशराज इन हॉटेलमध्ये बोलावून शिवाजी घरत यांना अगोदर दुचाकीवरुन व नंतर चारचाकी वाहनांतून पळवून नेण्यात आले. मोबाईलवर मारहाण करताना व्हिडीओ टाकून पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी मिळाली नाही तर पेट्रोल टाकून जाळून जिवे मारण्याची, हाताचे बोट कापून पाठवून देऊत अशी धमकीही दिल्याची फिर्याद गजानन घरत यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील संशयितांना सोमवारी (ता. २९) पोलिस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी फौजदार गव्हाणे यांनी सांगितले.

‘स्थानिक’ची भूमिका चोख; ‘शहर’समोर आव्हान

घटना दुपारी घडल्यानंतर संबंधितांनी याबाबत माहिती देताच या प्रकरणात एंट्री करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने पुजा देशभ्रतार व विक्रम डोंगरे यांना सहा तासांत अटक केली. संशयियांनी पीडित शिवाजी घरत यांना गेवराई, तलवाडा, माजलगाव, पाथरी आदी विविध भागांत वाहनांतून फिरविले. याच काळात आरोपींकडून कुटेंना फोन करुन पैसे द्या व भावाला न्या अशा धमक्यांचे फोन येत होते. पैसे जमविल्याचे व्हीडीओ कॉलवर दाखवत पोलिसांनी आरोपींना खेळवत ठेवत तांत्रिक सहाय्याने त्यांच्या लोकेशन मिळवून त्यांना अटक करण्यात यश मिळविले.

विशेष म्हणजे पोलिसांचे वाहन दिसल्यानंतर व पोलिसांनी संशयितांचे वाहन अडविण्यासाठी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावल्यानंतरही संशयितांनी आपले वाहनन सुसाट पळविल्याने काही काळ सिनेस्टाईल थरार रंगला. आता या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा नोंद आहे. तपासात यामागची साखळी शोधण्याचे आव्हान आहे. आरोपी ९ जानेवारीपासून उद्योजक कुटे यांच्या यंत्रणेच्या संपर्कात होती.

तिने पुण्यातील एका हॉटेलात त्यांच्या नातेवाईकाची भेटही घेतली. त्यांच्या वकिलाशी संपर्क करुन पैशांची मागणी करुन काही रक्कमही घेतल्याची माहिती आहे. तिला पुण्याला नेणारा, पुण्याला नेण्यासाठीचे वाहन, अपहरणासाठीचे वाहने नेमकी कोणाची याचा तपास केला जात आहे. तसेच, ज्या हॉटेलमधून अपहरण झाले त्या वेळेतल्या फुटेजचे व पुजा देशभ्रतार मुक्कामी असताना तिला भेटण्यासाठी कोण कोण येत होते, त्याच्या फुटेजचीही पोलिस पाहणी करत आहे. तिला कुटेंची सद्यस्थितीची बित्तंबातमी देणाऱ्याचाही शोध पोलिस घेत आहेत.

उद्योजकाच्या नातेवाईचे खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर पोलिसांनी प्रमुख संशयितांना तत्काळ अटक केली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास केला जात आहे. जबाब आणि तपासातून पुढे आलेली माहितीचे संकलन केले जात आहे.

— नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक बीड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT