Kirit Somaiya Kirit Somaiya
मराठवाडा

ED कडे तक्रारीनंतर सोमय्या धनंजय मुंडेंच्या कारखान्याकडे रवाना

जमीन खरेदी घोटाळ्याची तक्रार करुन पाठपुराव्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या बीड जिल्ह्यात पोचले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र शुगर कारखान्याच्या जमीन खरेदी घोटाळ्याची तक्रार करुन पाठपुराव्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गुरुवारी (ता.१६) जिल्ह्यात पोचले. अंबाजोगाईत कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते कारखान्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात येण्यापूर्वी श्री. सोमय्या यांना धमकी मिळाल्याचे त्यांनी सोशल मीडियावरुन सांगितले. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मुख्य प्रवर्तक (Kirit Somaiya) असलेल्या पुस (ता. अंबाजोगाई) येथील संत जगमित्र शुगर या साखर कारखान्यासाठी १९८८ साली मृत शेतकऱ्याचा २०१० साली अंगठा घेत जमीन (Beed) नावावर केल्याचा आरोपाखाली जुन २०१९ साली बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. राजाभाऊ फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धनंजय मुंडे यांच्यासह इतर १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. (Kirit Somaiya Leave For Dhananjay Munde's Sugar Mill In Beed)

या प्रकरणाच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, आता स्थगिती उठल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली. यावरुन बुधवारी (ता.१५) सोमय्या यांनी मुंबईच्या ईडी (सक्तवसूली संचालनालय) कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारच्या पाठपुराव्यासाठी सोमय्या गुरुवारी अंबाजोगाईसह पुस व बर्दापूरला येणार असे त्यांनी जाहीर केले होते. यानंतर त्यांना एका नंबरवरुन धमकी आल्याचे खुद्द सोमय्या यांनी ट्विट केले हेाते. ‘पिलू हे बीड आहे, येथे....मध्ये चटणी भरली जाते, तु ये अन॒ माघारी जा’, ‘तुझ्यासारखा मुर्ख, नादान अन॒...कुणीच पाहीला नाही’ अशा मजकूराची ही धमकीचा स्क्रिीन शॉट किरीट सोमय्यांचा यांनी ट्विट केला.

दरम्यान, धमकीनंतर किरीट सोमय्या यांनी दौरा कार्यक्रमात कुठलाही बदल न करता अंबाजोगाई गाठली. त्यांनी सुरुवातीला अंबाजोगाईत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आता ते संत जगमित्र कारखान्याकडे रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT