किर्तनकेसरी आणि वारकरी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव ही करण्यात आला होता. भारतीदास महाराज कोठाळकर या नावानेही ते सर्वदूर परिचित होते.
कुंभार पिंपळगाव : कोठाळा (ता. घनसावंगी) येथील ज्येष्ठ किर्तनकार तथा किर्तनकेसरी साहेबराव आश्रुबा साबळे (वय १०२) यांचे आज बुधवारी (ता. २६) सायंकाळी पाच वाजता निधन झाले. उद्या गुरूवारी सकाळी दहा वाजता कोठाळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या (Sahebrao Maharaj Kothalkar) पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वयाच्या विसाव्या वर्षापासून साहेबराव महाराज यांनी वारकरी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेतली. शेवटपर्यंत ते कीर्तन, प्रवचनासाठी राज्यभर जात होते.
किर्तनकेसरी आणि वारकरी भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव ही करण्यात आला होता. भारतीदास महाराज कोठाळकर या नावानेही ते सर्वदूर परिचित होते. त्यांचा मोठ्या प्रमाणात शिष्यवर्ग आहे. उद्या गुरूवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.