मराठवाडा

Sillod News : कोळी समाज बांधवांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरुच...प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचण

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत आहे अडचण

सचिन चोबे

सिल्लोड : सिल्लोड येथील उपविभागीय कार्यालयासमोर जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी कोळी मल्हार जमातीचे ठिय्या आंदोलन पाचव्या दिवशी देखील सुरुच आहे. आंदोलकांनी आता रात्रीच्या वेळी पारंपारिक भजने, वाघ्या मुरळी सारखे कार्यक्रम सुरू केले आहे. प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोळी समाज बांधव संतप्त झाले आहे.

अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यास अडसर येत असल्याने, तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या (आदिवासी) चिमुरड्यांनी मंगळवारी (ता.12) रोजी दुपारपासून येथिल उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. आंदोलकांनी जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून उठणार नाही असा पवित्रा घेतला.

सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार यांना अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत असल्याने समाजास जातीच्या प्रमाणपत्रापासून वंचित ठेवण्याचा प्रकार प्रशासन करित असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

रात्री उशीरापर्यंत लहान चिमुरड्यांसह पालकांनी कार्यालयात ठिय्या दिला. त्यानंतर देखिल रात्री कार्यालयासमोरच झोपण्याचा निर्णय घेऊन येथेच थांबण्याचा पवित्रा घेतला. पाच दिवस झाले तरी अद्याप यावर तोडगा निघालेला नसून समाज बांधवांचे आंदोलन सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT