Ladki Bahin Yojana sakal
मराठवाडा

Ladki Bahin Yojana: ई-सेवा केंद्र व एजंटामार्फत महिलांची होणारी आर्थिक लूट थांबवा !

अविनाश काळे

Dharashiv Latest Update: महायुती सरकारचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुरू केलेल्या मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण  योजनेचा लाभ घेण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ई-सेवा केंद्र व इतर दलालामार्फत महिलांची आर्थिक लूट थांबवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केली आहे.

या संदर्भात प्रा. बिराजदार यांनी मंगळवारी (ता. दोन) उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्याशी चर्चा केली. या योजनेसाठी शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांना आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, हमीपत्र इत्यादी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

रहिवासी प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये घेतले जात आहेत. ई-सेवा केंद्र व इतर दलालामार्फत महिलांची आर्थिक लूट केली जात आहे  तसेच ही योजना मंजूर करून देण्यासाठी काही दलाल अधिकचे पैसे घेत आहेत. ही लूट थांबवण्यात यावी तसेच कमीत कमी त्रास व खर्चात सर्व महिलांना या योजनेचा लाभ द्यावा.

ग्रामपंचायत, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत अर्ज व कागदपत्रे स्वीकारण्यात यावेत, स्वीकारण्यात आलेले अर्ज प्रशासनामार्फत नंतर ऑनलाईन करण्यात यावे जेणेकरून महिलांची आर्थिक पिळवणूक थांबेल अशी मागणी प्रा. बिराजदार यांनी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्याकडे केली. या प्रकियेदरम्यान कोणत्याही महिला भगिनींना अडचण येणार नाही यासाठी  प्रशासनाने सतर्क राहवे, जास्तीत जास्त महिलांना सदरील अनुदान उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी प्रा. बिराजदार यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT