आडुळ - गेल्या अनेक वर्षांपासुन जिल्हा परिषद सिंचन विभागाने डागडुजी केली नसल्याने व संबधिती विभागाला तशी कल्पना देवुन ही वेळीच उपाययोजना केली नसल्याने आडुळ, ता. पैठण येथील नागरीकांसाठी एकमेव जलश्रोत असलेल्या येथील पाझर तलावाला भगदाळ पडुन हा तलाव सोमवारी (ता. १४) रोजी दुपारी अचानक फुटला. व यातील पाण्याचा जोर जास्त असल्याने हे पाणी अचानक गावात घुसल्याने मोठे नुकसान होवुन जनजिवन विस्कळीत झाले. शिवाय अचानक गावात पाण्याचा महापुर आल्याने नागरीकात भितीचे निर्माण झाली होती.
नेहमी दुष्काळी गाव म्हणुन ओळख असलेल्या व वर्षभर विकतचे पाणी घेणारया या गावात गेल्या अनेक वर्षांनतर यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने येथील पाझर तलाव तुडुंब भरला होता. त्यामुळे येथील पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होईल अशी आशा होती.
माञ, गेल्या अनेक वर्षांपासुन या तलावाला पडलेल्या भेगांना दाबण्याची तसदी जिल्हा परिषद सिंचन विभागाने घेतली नसल्याने सोमवारी अचानक येथील पाझर तलावाच्या भेगातुन मोठ्या प्रमाणात पाणी निघण्यास सुरुवात झाली. या नंतर ही माहिती गावातील नागरीकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व भेगा दाबण्याचा पर्यंत केला.
माञ, पाण्याचा प्रवाह जास्त वाढल्याने दाबता आले नाही. हा तलाव फुटला. त्याखाली असलेल्या शेतीचे तर नुकसान झालेच, शिवाय गावातुन पाणी वाहत गेल्याने गावातील अनेक घरे व दुकानात पाणी शिरुन मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच माजी अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख (उबाठा) शुभम पिवळ, सरपंच बबन भावले, उपसरपंच जाहेर शेख, पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, रणजितसिंग दुल्हत, मंडळ अधिकारा वैशाली कांबळे, तलाठी भारत सवणे, तलाठी कडुबा तुपे, ग्रामसेवक नामदेव गाढेकर, आजीम शेख, रावसाहेब मोघे, पोलीस पाटिल सुनिल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली.
तलावाची डागडुजी गरज असल्याची कल्पना संबधित विभागाला दिली होती. माञ, त्यांनी दुरुस्ती केली नाही. वेळीच दुरुस्ती केली असती तर हि घटना घडलीच नसती.
- शुभम पिवळ (युवा सेना जिल्हा प्रमुख,उबाठा)
यंदा पाऊस चांगला झाल्याने येथील तलाव फुल भरला होता. त्यामुळे येथील जलश्रोतांच्या पाणी पातळीत वाढ होवुन काही प्रमाणात येथील पाणी टंचाई कमी झाली होती. माञ तलाव फुटल्याने भविष्यात आडुळ येथील नागरीकांना मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागु शकतो.
- जाहेर शेख, उपसरपंच आडुळ
१९७२ झाली या पाझर तलावाचे भुमीपुजन होवुन काम सुरु करण्यात आले होते. तेव्हा पासुल सदरील तलावाची कोणत्याच प्रकारची दुरुस्ती संबधित विभागाने केली नाही.
अनं गावात पाणी शिरले
तलाव फुटल्यानंतर तलावातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने येथील शमशुद्दी सय्यद, युनुस शेख, नुरुद्दिन सय्यद, फेरोज सय्यद यांच्या घरात पाणी शिरुण कपाशी व धान्याचे नुकसान झाले तर येथील बाजार पेठेत पाणी घुसल्याने येथील जब्बार शेख, मजीद शेख, आसेफ पठाण, नासेर शेख सह इतर दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सदरील तलावाची फुटलेल्या धारीला पोकलॅन्ड व जेसीबीच्या सहाय्याने बंद करण्याचे काम सुरु असुन लवकरच धार दाबण्यात येईल.
- दादासाहेब खजिनदार (कनिष्ठ अभियंता, जिप सिंचन विभाग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.