Jalna Maratha Andolan Esakal
मराठवाडा

Jalna Maratha Andolan: राहुल गांधी यांच भाषण जनतेतून चर्चेतून घालवण्यासाठी जालन्यात लाठीमार, काँग्रेसचा आरोप

अंकिता खाणे (Ankita Khane)

Jalna News : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी काल (शुक्रवारी) लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेमुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केली. परिसरात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली.

यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणंही चांगलंच तापल्याचं दिसून आलं. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

'या सरकारचा प्रत्यय आम्हाला वारंवार पहायला मिळतो आहे. या सरकारची मानसिकता ही खच्चीकरण करणारी आहे. भाजप प्रणित देशातील सरकार असो किंवा राज्यातील सरकार असो हे सरकार लोकशाहीच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता निवडणुकीच्या तोंडावर सांगायचं आम्ही आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं. धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये या पध्दतीची एक वाटचाल सुरू झाली',असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

तर पुढे बोलताना पटोले म्हणाले की, '२०१४ ते २०१९ च्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना आधिकार नसतानाही चुकीचा कायदा आणून आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून पुन्हा पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकता येतील असा प्रयत्न भाजप सरकारने केला.

तर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. जी काही मर्यादा आहे ४० टक्क्यांची तिला वाढवा देशातील सरकार भाजपच्या ताब्यात आहे. पण तिथे त्यांच्यात बोलण्याची हिम्मत नाही, कारण तिथे त्यांच्या नोकऱ्या जातील', असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

'त्याचबरोबर काल उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज होणं ही घटना इतिहासातील पहिली घटना आहे. काल इंडियाची बैठक होती. त्यामध्ये राहुल गांधी यांच भाषण जनतेतून चर्चेतून घालवण्यासाठी कालची घटना घडवल्याचाही आरोप पटोलेंनी यावेळी केला आहे. तर राज्याचे गृहमंत्री सांगतात आम्ही सौम्य लाठीचार्ज केला पण तो का केला असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर या घटनेवर नाना पटोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत पोलीस आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

Tirupati Laddu: तिरुपती प्रसाद प्रकरणावरून केंद्राने मागविले उत्तर; दोषींवर होणार कठोर कारवाई

प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT