लैंगिक अत्याचार  sakal
मराठवाडा

Latur crime news : जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार

उमरगा तालुक्यातील घटना, नराधमाला अटक

सकाळ वृत्तसेवा

उमरगा : जन्मदात्या पित्याने पंधरा ते सोळा वर्षीय पोटच्या मुलीवर तीन, चार महिने लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या एका गावात चार दिवसांपूर्वी घडली. पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली. सध्या तो तुरुंगात आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय व्यसनाधीन पित्याने स्वतःच्या  मुलीवर सतत तीन चार महिने लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोठेही न सांगण्यासाठी तो मुलीला धमकी द्यायचा. ही बाब पीडितेच्या आईलाही माहिती नसल्याचे समजले. मुलीच्या पोटात सतत  दुखू लागल्याने पालकांनीच मुलीची खासगी व शासकीय रुग्णालयात तपासणी केली. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले.

त्यानंतर पित्याने मुलीला धमकी देत त्या गावातील पोलिस ठाणे गाठले. एक- दोन मुलांमुळे गर्भवती झाल्याचा बनाव करून तशी तक्रार देण्यास तिला सांगितले. दरम्यान, महिला पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेत चौकशी केली असता वडिलांनीच अत्याचार केल्याचे उघड झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधाम वडिलांना अटक केली.

न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला  तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती तपास करणारे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

Crime News : अमरावती मार्गावर १७ किलो सोने, ५० किलो चांदी जप्त...अंबाझरी पोलिसांची कारवाई : गनमॅनसह चौघे ताब्यात

Hingoli Assembly Election 2024 : निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी थंडावणार

Best Places Near Mussoorie: मसूरीजवळील 'या' सुंदर ऑफबीट ठिकाणांना करा एक्सप्लोअर, सहल राहील स्मरणीय

Laxman Hake: ''...तर महायुतीला मतदान करा'' लक्ष्मण हाकेंनी दिला पाठिंबा; दगडापेक्षा वीट मऊ

SCROLL FOR NEXT