लातूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वोच्च यशाचा रेशो कायम राखत सलग दुसऱ्या वर्षी म्हणजेच नुकत्याच जाहीर झालेल्या नीट-२०२३ निकालात येथील श्री विद्या आराधना अकॅडमीने उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. अकॅडमीच्या अस्मिता रामराव कदम हिने ७२० पैकी ७०० गुण मिळवित देदीप्यमान यश मिळवले. ५१ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवित यशाला गवसणी घातली आहे.
सर्व समाजघटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालू देण्यासाठी शिक्षण आणि व्यवस्थापन क्षेत्रांतील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर संचालक प्रा. सतीश पवार, प्रा. संजय लड्डा यांनी २ जून २०२१ ला विद्या आराधना अकॅडमीची स्थापना केली. गेल्या वर्षीच्या नीट परीक्षेत ५४० विद्यार्थ्यांपैकी १३० विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे.
यामध्ये अकॅडमीचा सक्सेस रेशो ३० टक्के असून तो सर्वोत्तम आहे. हाच सक्सेस रेशो सलग दुसऱ्या वर्षी कायम आहे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अकॅडमीच्या दीड हजार विद्यार्थ्यांपैकी ५१ विद्यार्थ्यांनी ६०० पेक्षा अधिक, १५० विद्यार्थ्यांना ५५० पेक्षा अधिक, २२५ विद्यार्थ्यांना ५२५ पेक्षा अधिक, ३२५ विद्यार्थ्यांना ५०० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. अकॅडमीची अस्मिता कदम हिने ७२० पैकी ७०० गुण मिळवित देदीप्यमान यश मिळवले आहे. तिने जेईई (मेन)-२०२३ मध्ये ९९.२१ पर्सेंटाईल आणि एमएचटीसीईटी -२०२३ मध्येही ९९.९८ पर्सेंटाईल मिळवत यश प्राप्त केले आहे.
विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळावेत यासाठी योग्य नियोजन, निकाल ओरिएंटेड प्रोग्राम तयार करून त्याची योग्य अंमलबजावणी केली जात आहे. तसेच अकॅडमीचे संचालक प्रा. सतीश पवार, प्रा. संजय लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ प्राध्यापक असल्याने विद्यार्थ्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होत असल्याचे अकॅडमीने म्हटले आहे. एमबीबीएस शिक्षण एम्स या सर्वोच्च महाविद्यालयात व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, ज्यांना आणखी तयारी करून स्वप्नाला गवसणी घालायची असेल त्यांच्यासाठी अकॅडमीतर्फे १९ जूनपासून बॅच सुरू होत आहे. विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन प्रा. सतीश पवार, प्रा. संजय लड्डा यांनी केले आहे.
अकॅडमीचे गुणवंत
नीट-२०२३ परीक्षेत श्री विद्या आराधना अकॅडमीच्या गिरिजा शिंदे ६८५, पार्थ कराड ६८०, आशुतोष कोरे ६७५, सार्थक खुने ६६०, सोनल निपटे ६५१, चैतन्य पाटील ६५२, पार्थ पंत ६५०, हर्ष सातपुते ६५०, पारस पाटील ६५०, आरुषी रांदड ६४८, रितेश बनकर ६४२, स्वानंदी मते ६४२, वैभव शेरे ६४१, वेदांगी देशपांडे ६३७, आदित्य ढगे ६३७, आशुतोष कुलकर्णी ६३७, औदुंबर माळी ६३३, देवयानी सिरसाट ६२५, कौस्तुभ कुलकर्णी ६२५, शशांक शिनगारे ६२४, श्रुती माळोदे ६२३, समर्थ धर्माधिकारी ६२१, अमन काझी याने ६२१ गुण घेत भरारी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.