Latur Lok Sabha eSakal
मराठवाडा

Latur Lok Sabha : काँग्रेस आपला गड परत मिळवणार, की कमळ फुलणार? लातूरकरांचा कल काय सांगतो?

अंकिता खाणे (Ankita Khane)

Latur Lok Sabha 2024 : राज्यासह देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात दोन टप्यातील मतदान पार पडलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे सात तारखेला पार पडेल. या दिवशी जिथे मतदान होईल, त्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर चुरशीची लढत दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये या वेळी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस आपला गड परत मिळवणार, की पुन्हा एकदा कमळ फुलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपचे सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यामध्ये हा सामना रंगत आहे.

निवडणुकीवर प्रभाव टाकणारे मुद्दे

लातूरमधील मतदारांसमोर कित्येक प्रश्न आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये रेल्वे कोच कारखाना, पीटलाईन, रस्ते, कचराप्रश्न, लातूरच्या पाण्याचा प्रश्न, उद्योग, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा भाव, रस्त्याच्या दुरवस्था, कृषी, सिंचन, सौरउर्जा, शेतकरी आत्महत्या, विकासकामे, मोठमोठ्या सभेमध्ये विकासाबाबत न बोलता विरोधी पक्षांवर केलेली टीका हे मुद्दे मतदानावर प्रभाव टाकू शकतील.

निवडणुकीचे समीकरण

लातूर मतदारसंघ राखीव अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसने लिंगायत मतांचा विचार करून डॉ. शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली आहे. लिंगायत समाजाचे नेतृत्त्व करणारा नेता किंवा खासदार दिल्याने काँग्रेसने ही निवडणुक चुरशीची बनवली आहे. दरम्यान या ठिकाणी वंचितने देखील आपला उमेदवार देत निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणला आहे.

कोणत्या पक्षाचे आमदार किती?

लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, निलंगा व लोहा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी लातूर शहर व ग्रामीण काँग्रेस, लोहा अपक्ष, निलंगा भाजप, अहमदपूर व उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या मतदारसंघामध्ये जास्त आमदार हे महायुतीचे आहेत, तर मविआचे म्हणजेच काँग्रेसचे २ आमदार आहेत.

दोन बड्या नेत्यांच्या सभा मात्र, विकासाच्या मुद्यावर चर्चा नाही

लातूर मतदारसंघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या दोन बड्या नेत्यांच्या सभा पार पडल्या. या सभांमधून त्यांनी लातूकरांच्या प्रश्नावर, स्थानिवक मुद्यावर चर्चा न करता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचं लातूरकरांचं म्हणणं आहे. आमचे प्रश्न जो सोडवेल त्यांना आम्ही मतदान करू असं लातूरमधीन मतदार सांगतात.

ही निवडणुक मोठ्या प्रमाणावर चुरशीची ठरणार आहे, संपुर्ण देशमुख कुंटुंब शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतल्याचं दिसून येत आहे. अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक ठरणार आहे.

२०१९ चे चित्र

  • सुधाकर शृंगारे (भाजप) विजयी मते : ६,६१,४९५

  • मच्छिंद्र कामत (काँग्रेस) मते : ३,७२,३८४

  • राम गारकर (वंचित बहुजन आघाडी) मते : १,१२,२५५

  • नोटा मते : ६,५६४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT