Latur Lok Sabha 2024 Esakal
मराठवाडा

Latur Lok Sabha 2024: भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत; काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याला संधी

Latur Lok Sabha 2024: लातूर लोकसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००९ मध्ये कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले.

सकाळ वृत्तसेवा

Latur Lok Sabha 2024: लातूर लोकसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००९ मध्ये कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिले. त्यामुळे भाजपकडून विजयाची हॅट्‌ट्रिक साधण्याचा प्रयत्न असेल. या वेळी डॉ. शिवाजी काळगे यांच्या माध्यमातून नवखा उमेदवार काँग्रेसने पुढे आणला आहे. या मतदारसंघात सातत्याने काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली आहे. यावेळेसदेखील अशीच दुरंगी लढत होणार आहे.

२०१९ चे चित्र

सुधाकर शृंगारे (भाजप) विजयी मते : ६,६१,४९५

मच्छिंद्र कामत (काँग्रेस) मते : ३,७२,३८४

राम गारकर (वंचित बहुजन आघाडी) मते : १,१२,२५५

नोटा मते : ६,५६४

वर्चस्व

२००४ : भाजप

२००९ : काँग्रेस

२०१४ : भाजप

२०१९ : भाजप

सद्य:स्थिती

काँग्रेसचा बालेकिल्ला, पण आता भाजपचे वर्चस्व

भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्यावर पुन्हा विश्वास

भाजपकडून विजयाची हॅट्‌ट्रिक साधण्याचा प्रयत्न

काँग्रेसकडून चाचपणी, डॉ. शिवाजी काळगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब शक्य

काँग्रेसच्या उमेदवाराची माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांच्यावरच भिस्त

हे मुद्दे प्रभावी ठरणार

मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना रशियन कंपनीला विकला गेल्याचा आरोप

मतदारसंघाचा रखडलेला औद्योगिक विकास

उजनी धरणातून पाणी पुरवठ्याचा प्रश्न

जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग

निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दाही प्रभावी ठरणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT