Moiej Shaikh sakal
मराठवाडा

Assembly Election 2024 : मुस्लिम समाजाला हव्यात ४० जागा; मराठवाड्यातील काँग्रेसमधील मुस्लिम नेते एकवटले

राज्यात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचे काही वर्षांपूर्वी वीस ते पंचवीस आमदार असायचे. आता ही संख्या कमी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर - राज्यात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाचे काही वर्षांपूर्वी वीस ते पंचवीस आमदार असायचे. आता ही संख्या कमी झाली आहे. जे आमदार आहेत, त्यातील बहुतांश परप्रांतीय आहेत. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राज्यात मुस्लिम समाजाला किमान ४० जागा मिळाव्यात, अशी मागणी या समाजाच्या नेत्यांतून होत आहे. यासाठी मराठवाड्यातील काँग्रेसमधील मुस्लिम नेते एकवटले आहेत. यातून मंगळवारी (ता. सहा) छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकही घेण्यात आली.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने एकगठ्ठा मतदान केले आहे. हा समाज सातत्याने काँग्रेस तसेच सध्याच्या महाविकास आघाडीच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आहे. तरीही समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही, याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत समाजाला ४० जागा द्याव्यात अशी मागणीही बैठकीत पुढे आली.

माजी आमदार एम. एम. शेख, माजी आमदार सिराज देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख (लातूर), मराठवाडा विभागीय अध्यक्ष हमद चाऊस (छत्रपती संभाजीनगर), युसूफ शेख, धाराशिव जिल्ह्याचे कार्याध्यक्ष खलील सय्यद, माजी महापौर अब्दुल सत्तार शेख (नांदेड), माजी उपमहापौर मसूद शेख, प्रदेश सरचिटणीस हाफिज शेख (हिंगोली), प्रदेश सचिव खालेद पठाण, प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद (सिल्लोड), शकील मौलवी, रशीद मामू, अरेफ शेख, माजी नगरसेवक नादेरुल्लाह हुसेनी, उपनगराध्यक्ष मोईनुद्दीन पठाण, मुहीब अहेमद, हमीद नवाज अख्तर, अयुब शेख, माजी नगरसेवक शेर अली (नांदेड), शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार (परभणी), फरीद देशमुख, डॉ. सर्ताज पठाण, रोटी बँकेचे प्रणेते युसूफ मुकाती, गुलाब पटेल, मजहर पटेल, युसूफ हिरा पटेल आदी या बैठकीला उपस्थित होते.

राज्यात प्रतिनिधित्व देताना अन्याय केला जात असल्याची मुस्लिम समाजाची भावना आहे. यातूनच मराठवाड्यातील काँग्रेसचे मुस्लिम नेते एकत्र आले होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भानेही चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीकडे ४० जागांची मागणी आहे. दहा ऑगस्टला लातूर येथे काँग्रेसची विभागीय बैठक होत आहे. त्यावेळी वरिष्ठांची भेट घेतली जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन ही मागणी केली जाणार आहे.

- मोईज शेख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT