Latur Rains one dead  
मराठवाडा

Latur : 30 मिनीटांत ढगफुटीसारखा पाऊस, पाण्याचा अंदाज नसल्याने पुलावरून दुचाकीस्वार गेला वाहून

या तुफान पावसामुळे या दोन गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याला पाणी आले होते.

सकाळ डिजिटल टीम

या तुफान पावसामुळे या दोन गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याला पाणी आले होते.

पावसामुळे अनेक वेळा नद्या दुथडी भरुन वाहत असल्याने पुलावर पाणी आलेले असते. दरम्यान, अशावेळी अनेकजण पाणी आलेल्या पुलावरून जीव धोक्यात घालणारी वाहतूक करतात आणि बऱ्याचवेळा असे धाडस करणाऱ्यांना जीवाला मुकावे लागते. सध्या अशीच एक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.

लातुर जिल्ह्यातील औसा येथील लामजाना, अपचुंदा, जयनगर या परिसरात फक्त तीस मिनिटांत ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे लहान-मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांना प्रचंड पाणी आले. दरम्यान, पावसामुळे या दोन गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याला पाणी आले होते. पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लातूरकडे जाणारी एक दुचाकी पुलाच्या मध्यभागी आल्यावर वाहून गेली आहे.

या दुचाकीवरून दोघेजण प्रवास करत होते. यातील एका व्यक्तीला झाडाचा आधार मिळाल्याने पंधरा मिनिट त्याने वाचण्यासाठी धडपड सुरु होती. पाणी वाढले आणि तोही पाण्यात वाहून गेला. तर दुसऱ्या व्यक्तीला गावकऱ्यांनी वाचवले आहे. दरम्यान, वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आशिष कृष्णराव येणकर असे असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेली माहिती अशी की, मूळ बाभळगाव येथील रहिवासी असलेले दोघे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते. नित्याप्रमाणे काम संपवून ते घराकडे निघाले होते. दरम्यान, औसा येथील लामजाना, अपचुंदा, जयनगर या परिसरात तीस मिनिटांत ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने येथील लहान-मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांना मोठे पाणी आले होते. पुलाच्या पलिकडे गाडी नेण्यासाठी त्यांनी पाण्यात गाडी घातली आणि प्रवास करू लागले मात्र पाण्याचा अंदाज ने आल्याने गाडीसह ते दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

यातील एकजण ग्रामस्थांच्या प्रयत्नाने सुखरुप वाचला असून दुसऱ्याचा मृत्यू झाला आहे. संतोष बसवराज बिडे या व्यक्तीचे प्राण वाचले असून तो सध्या रुग्णालयात आहे. अपचुंदा गावातील तरुणांनी तात्काळ प्रशासनाला संबंधित घडनेची माहिती देण्याचं काम केलं. या रस्त्यावरुन प्रवास धोक्याचा आहे हे लक्षात येताच अपचुंदा आणि जयनगर गावातील तरुणांना पुलाच्या दोन्ही बाजूला उभे केले. मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच औसाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी हे इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी हजर झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. वाहून व्यक्तीला शोधण्याचे काम सुरु आहे. एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ishan Kishan: धडाकेबाज फलंदाजाचे वडीलही राजकारणात; लवकरच करणार मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश

Viral Video: पुण्यात दोन तरुणांची हुल्लडबाजी, रिल्ससाठी जीव घातला धोक्यात! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

अरे देवा! Babar Azam ला आता झिम्बाब्वेविरुद्ध नाही खेळता येणार; PCB ने घेतला मोठा निर्णय, कॅप्टनशिवाय निवडले संघ

Nanded : ईव्हीएम फोडणे, व्हिडिओ काढणे पडले महागात,लोकसभा निवडणुकीत दाखल झालेले २३ गुन्हे न्यायालयात

Jayashree Thorat: जयश्री थोरातांवरच गुन्हा दाखल! वसंत देशमुखांवर काय कारवाई झाली? संगमनेरात संतापाची लाट

SCROLL FOR NEXT