मराठवाडा

Latur rape-murder: ७० वर्षीय महिलेचा केला खून अन् चार दिवस करत राहिला बलात्कार; लातूरमध्ये घृणास्पद प्रकार

संतोष कानडे

Latur Crime News: मागच्या काही दिवसांपासून देशभरात बलात्कार आणि खूनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चिमुकल्या मुली हैवानांच्या शिकार होत आहेत. आता वयस्कर महिलाही सुरक्षित नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याला हादरवून टाकणारी एक घटना लातूरमध्ये घडली आहे.

लातूरमधल्या एका गावात ७० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करण्याचा आला. एवढंच नाही तर ३१ वर्षीय आरोपीने तब्बल चार दिवस मृत महिलेवर बलात्कार केल्याचं कळतंय. भादा, औसा आणि लातूर या तीन ठाण्याची पथक संबंधित गावामध्ये तपास करत आहेत. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

घटनेतील ३१ वर्षीय आरोपीचं नाव मन्सूर सादिक होगाडे असं आहे. मन्सूर हा शेतमजूर आहे. त्याच्या विचित्र स्वभावामुळे त्याची पत्नी त्याच्यासोबत रहात नव्हती. त्याची आईदेखील त्याच्या वागण्याला वैतागलेली होती, असं सांगितलं जातंय. काही दिवसांपूर्वी मन्सूरची आई गावी गेली होती. त्याचा मन्सूरने फायदा उचलला.

गावातून एक ७० वर्षीय महिला गायब होती. मन्सूरने त्या महिलेचं अपहरण केलं, तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली. एवढंच नाही तर मृत महिलेच्या प्रेतावर मन्सूर चार दिवस बलात्कार करत होता, अशी माहिती वृत्तवाहिनीने दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मन्सूरला अटक केलीय.

आरोपी मन्सूर हा ३१ वर्षांचा आहे. घटनेनंतर जेव्हा आई गावावरुन माघारी आली तेव्हा तिला घरात दुर्गंधी येत असल्याचं दिसलं. घरात मृतदेह असल्याचं लक्षात आल्यानंतर आईनेच गावामध्ये याची माहिती दिली. घटनास्थळी भादा, औसा आणि लातूर पोलिसांचं पथक दाखल झालं आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पीएम रिपोर्टनंतरच या घटनेतील सत्यता बाहेर येणार आहे. या घटनेमुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. पाशवी मनोवृत्तीच्या मन्सूरची पोलिस चौकशी करत असून या प्रकरणी आणखी बारकावे पुढे येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Encounter: आणखी एक एन्काउंटर! दोन जवानांची रेल्वेतून फेकून हत्या; एक लाखाचे बक्षिस असलेल्याला पोलिसांनी संपवले

शाब्बास पोरींनो! पुण्याच्या लेकीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चीनला नमवले अन् ऐतिहासिक पदक जिंकले

... म्हणून प्रसाद ओकने केलं स्वप्नील जोशीचं कौतुक; पोस्ट करत म्हणाला-

Work Stress Management : कुटुंब आणि ऑफिसमध्ये भरडले जाऊ नका, असं करा नियोजन कामाचा ताप होणार नाही

F&O Traders: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताय सावधान! गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे 1.81 लाख कोटी पाण्यात

SCROLL FOR NEXT