latur sakal
मराठवाडा

Latur : मांजरा नदी वाहतेय दुथडी भरून

१४५ किलोमीटरच्या नदीपात्रात पाणी; नदीकाठच्या पिकांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यात यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत आहे. त्यात गेल्या काही दिवसापासून तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीच्या १४५ किलोमीटरचे पात्र पाण्याने भरले आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पिके पाण्याखाली गेली आहेत. याचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे होण्याची गरज आहे.

पावसाळ्याचे पहिले अडीच तीन महिने कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला होता. पण, सप्टेंबरपासून मात्र पावसाने जोर कायम ठेवला आहे. दररोज पाऊस पडत आहे. यावर्षी मांजरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. रोज धरणाचे पाच सहा दरवाजे उघडून पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी नाल्ये देखील तुडूंब भरून वाहत आहेत. धरणातील पाणी तसेच इतर नदी नाल्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाहामुळे मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

या नदीवरील सर्वच बॅरेजेसच दरवाजे उघडून पाणी खाली सोडून देण्यात येत आहे. सध्या मांजरा नदीचे १४५ किलोमीटरचे पात्र पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे तेथील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे सर्व पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे

१२२ टक्के पाऊस

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६८७.९ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. पण, यावर्षी आतापर्यंत ८४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. याची टक्केवारी १२२.१ इतकी आहे. यात लातूर तालुक्यात आतापर्यंत सरासरी ८३८.१, औसा ७८८, अहमदपूर ९७४.६, निलंगा ७३०.४, उदगीर ९०३.२, चाकूर ८३९.८, रेणापूर ९२२.३, देवणी ७७४.७, शिरूर अनंतपाळ ७६२.४, जळकोट ९६५.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT