lature sakal
मराठवाडा

Latur News : कोकणवासीयांची सोय अन लातूरकरांची गैरसोय

१८५ बस दिमतीला; भाडेवाढीने प्रवासी मेटाकुटीला

हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा

लातूर - गणेशोत्सव आणि ज्येष्ठा गौरी हे दोनही सण अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात राहणारे लातूरकर या सणानिमित्त आपल्या गावाकडे येतात.

त्यामुळे पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर अशा शहराच्या ठिकाणी परिवहन महामंडळाने जास्तीच्या बसेस सोडणे अपेक्षित असते. पण तसे न होता उलट येथील १८५ बसेस कोकणात कोकणवासीयांच्या दिमतीला पाठवण्यात आल्या आहेत. यात कोकणवासीयांची सोय झाली पण लातूरकरांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. अधिकचे भाडे देऊन येथील प्रवासी नागरिकांना लातूरला येवून परत जावे लागले आहे.

दरवर्षी गणेशोत्सव व ज्येष्ठा गौरी हे दोनही महत्वाचे सण उत्साहात साजरे केले जातात. लातूर जिल्ह्यातील अनेक नागरीक कामाच्या व नोकरीच्या निमित्ताने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर, मुंबई अशा विविध शहरात राहतात.

या सणाच्या निमित्ताने हे नागरीक आपल्या गावाकडे येतात. अशा वेळी परिवहन महामंडळाने या शहरासाठी जास्तीच्या बसेस सोडणे अपेक्षीत होते. पण या लांब पल्ल्याच्या शहराला जाणाऱ्या बहुतांश बसेस बंद केल्या आणि त्या सर्व बसेस कोकणवासीयांच्या दिमतीला पाठवून देण्यात आल्या. जिल्ह्यातून १८५ बसेस ता. १६ सप्टेंबरपासून कोकणात गेल्या आहेत.

खासगी ट्रॅव्हलसला हजारावर भाडे

परिवहन महामंडळाच्या निर्णयाचा मोठा फटका लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना बसला आहे. पुणे तसेच औरंगाबाद या दोन शहरात मोठ्या प्रमाणात लातूरकर राहतात. लातूरला येण्यासाठी रेल्वेंची संख्या अत्यंत कमी आहे. त्यात सणासुदीच्या दिवसात गर्दी असते. तर दुसरीकडे सणाची गर्दी पाहून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून अव्वाचे सव्वा भाडे आकारले जात आहे.

पुण्या सारख्या ठिकाणी जाण्यासाठी एक हजार ते दीड हजारापर्यंत भाडे घेतले जात आहे. त्यामुळे प्रवशांचा ओढा परिवहन महामंडळाच्या बसेसकडे असतो. पण बहुतांश बसेस बंद करून कोकणात गेल्याने या प्रवाशांची निराशा झाली. अनेकांना सोलापूर मार्गे लातूरला यावे लागले. अनेकांनी भाडे जास्त देऊन घर गाठले आहे.

कोकणात गणेशोत्सवासाठी या वर्षी १८५ बसेस पाठवण्यात आल्या आहेत. ता. १६ सप्टेंबरपासून या बसेस गेल्या आहेत. या पैकी ६० बसेस दोन दिवसापूर्वी परत आल्या आहेत. १२५ बसेस आजूनही कोकणातच आहेत. ता. २६ सप्टेंबरपर्यंत त्या परत येतील. लांब पल्ल्याच्या बसेस तिकडे पाठवण्या आल्या. ग्रामीण भागातील मार्गावर मात्र परिणाम होवू दिलेला नाही.

अभय देशमुख, जिल्हा वाहतूक अधिकारी, परिवहन महामंडळ, लातूरॉ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT