Latur News sakal
मराठवाडा

Latur News : लातूरकरांनी अनुभवले प्रभामंडल;चमकदार खगोलीय घटना पाहण्यासाठी नजरा आकाशाकडे

सकाळ वृत्तसेवा

लातूर : वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या लातूरकरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. त्यातच आकाशात पावसाची चाहूल दर्शविणारे २२ अंश हेलो (प्रभामंडल) हे सूर्याभोवती लातूरकरांना पाहायला मिळाले. अशा अनोख्या चमकदार खगोलीय घटनेने लातूरकरांची सोमवारची सकाळ अविस्मरणीय बनली.

आकाशात सुमारे २० हजार फुटांवर सिरस नावाचे ढग तयार झाले, की असे दृश्य दिसते. या ढगांमध्ये बर्फाचे सूक्ष्म स्फटिक असतात, ज्यातून सूर्याची किरणे विशिष्ट कोनातून गेल्यावर प्रकाशाचे अपवर्तन होते आणि असे दृश्य तयार होते. याला आकाशात सूर्याभोवती निर्माण झालेले प्रभामंडल अर्थात हेलो म्हटले जाते. सकाळी साडेदहानंतर दुपारी एकपर्यंत ते लातूरकरांना पाहायला मिळाले. अनेकांनी अतिशय उत्सुकतेने या खगोलीय घटनेचा आनंद घेतला.

जेव्हा पावसाचे वेध लागलेले असतात, जेव्हा सूर्याभोवती आर्द्रता असलेले ढग असतात. त्यावेळी आकाशात अशी खगोलीय घटना पाहायला मिळते. तीव्र स्वरूपाचा उन्हाळा संपत असताना या घटना प्रामुख्याने घडतात.

— महादेव पंडगे,

खगोल अभ्यासक, लातूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT