नांदेड : राज्यात खरिपामध्ये या धान्याचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याचबरोर दैनंदिन आहारामध्ये या धान्याची भाकरी चवीने खाल्ली जाते. विशेष म्हणजे या धान्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक घटक असतात. शिवाय थंडीच्या दिवसात तर या धान्याची भाकर खाल्ली पाहिजे. हिवाळ्यात हि भाकर खाण्याचे बरेच फायदे आहेत. नित्य आहारामधील ही भाकरी थंडीमध्ये शरीर उबदार ठेवते. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.
याशिवाय हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जो रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. त्याच बरोबर या धान्याच्या भाकरीमध्ये मुबलक तंतू आढळतात, त्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर हिवाळ्यात ही भाकर नियमीत खाने आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
येथे क्लीक करा -- ठेवला विश्वास, झाली फसवणूक...! .
खरिप हंगामातील मुख्य पीक
खरिप हंगामातील मुख्य पिकापैकी एक पिक बाजरी, होय बाजरीची भाकर खाल्ल्यानंतर फार काळ भूक लागत नाही. बाजरी वजन नियंत्रित करण्यास मदत करते. बाजरी ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत. बाजरीचे नियमीत सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. बाजरी हे धान्य शरीराला सर्वात जास्त उष्णता देतात. थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी अवश्य खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी अवश्य खाऊ घालावी. यामध्ये आरोग्यवर्धक गुण असतात. इतर धान्यांच्या तुलनेत बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण राहते. ग्रामीण भागात बाजरीची भाकरी आणि दुध, गुळाचे हिवाळ्यात आवडीने सेवन केले जाते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक तत्त्व, मॅग्नेशियम,कॅल्शियम,मॅग्नीज, ट्रिप्टोफेन, फायबर, व्हिटॅमिन- बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.
हिवाळ्यात अवश्य खावी बाजरीची भाकरी:
बाजरी ची भाकरी खाण्याने ऊर्जा मिळते ती शरीरा साठी लाभदायक ठरते व भुक देखील लवकर लागत नाही त्यामुळे आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. बाजरीची भाकरी खाल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाला होणाऱ्या आजारांची शक्यता दुरावते व रक्तदाब देखील नियंत्रित करते .बाजरी ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत. त्यामुळे बाजरी नेहमी हिवाळ्यात खावी.
उघडून तर पहा --महापोर्टल विरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश
जिरायती, बागायती क्षेत्रात उत्पादन:
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य भागात खरिपामध्ये अधिक प्रमाणात बाजरी उत्पादन घेतले जाते. कमी पाण्यावर येणारे पिक म्हणून जिरायती क्षेत्रासाठी शेतकरी बाजरी पिकाला अधिक पसंती देतात. पर्जन्यमान चांगले राहीले तर उत्पादनही भरपुर मिळते. रब्बी हंगामातही बागायती क्षेत्रात उन्हाळी बाजरीचे पिक घेतले जाते. ग्रामीण नगारीक नियमी आहारसाठी बाजरीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.