new 
मराठवाडा

भरघोस निधी देऊन परभणीचा विकास करू ; मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन 

गणेश पांडे

परभणी : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. केवळ अतिवृष्टीग्रस्त गावांचे पिक पंचनामे न करता सरसकट सर्व गावातील पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी गुरुवारी (ता.एक)आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या वेळी आमदार पाटील यांनी परभणीच्या विविध प्रलंबित मागणीसाठी निधीची मागणी केली. याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी परभणीच्या विकासासाठी भरीव निधी देवू असे आश्‍वासन दिले. 

आमदार डॉ. राहुल पाटील यांनी नगरविकास विभागांतर्गत परभणी येथे नवीन अभ्यासिका केंद्र उभारणे ७.५० कोटी, परभणी येथे नवीन तारांगण व विज्ञान केंद्र उभारणे १८.७५ कोटी रुपये निधीची गरज असल्याचे सांगितले. तसेच परभणी येथे नवीन नाटयगृहाचे काम सुरु झाले असून ते काम पुर्ण करण्यासाठी २१ कोटी निधी लागत आहे. त्यासाठी आतापर्यंत दहा कोटी निधी मिळाला आहे. उर्वरित ११ कोटी निधी लवकर मंजूर करावा अशी मागणी या वेळी केली. 

अल्पसंख्याक शासकीय तंत्रनिकेतन बांधकामासाठी निधी द्या
पर्यटन विभागांतर्गत परभणी येथे नवीन मत्स्यालय १९.५० कोटी निधी देण्यात यावा. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे परभणी येथे उप परिसर (सब कॅम्पस) स्थापन करण्याचा प्रस्ताव सचिवांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावास मान्यता द्यावी व उप परिसर इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी विनंती केली. तसेच परभणी येथे मंजुर असलेल्या अल्पसंख्याक शासकीय तंत्रनिकेतनच्या बांधकामासाठी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन द्यावा. वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत परभणी येथे प्रस्तावीत शासकिय मेडीकल कॉलेजसाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशीही मागणी केली. 

अतिरीक्त नवीन २५० वीज वितरण रोहीत्रांची आवश्यकता 
परभणी जिल्हा अंतर्गत कृषि हंगामात वीज रोहीत्रावर पडणाऱ्या अतिरीक्त भारामुळे वीज रोहीत्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत असून त्या संबंधाने तत्काळ वीज रोहित्र दुरुस्त करुन वीजपुरवठा पुर्ववत व सुरळित करण्यासाठी आवश्यक एवढे तेल उपलब्ध होणे गरजेचे आहे. होणाऱ्या वीज पुरवठया समस्या टाळण्यासाठी अतिरीक्त नवीन २५० वीज वितरण रोहीत्रांची आवश्यकता आहे. परभणी जिल्ह्यांतर्गत ग्रामीण व शहरी भागांमध्ये नविन वसाहतीमध्ये वीज वितरण वाहिन्या उभारणी करीता १५ कोटी निधीची आवश्यकता आहे. समसापुर (ता.परभणी) येथे ३३ केव्ही उपकेंद्राकरिता शासकीय गायरान जमीन उपलब्ध आहे. सदरील ठिकाणी ३३ के. व्ही मंजूर झाल्यास ग्रामीण भागातील वीजेच्या समस्या कमी करण्यास मदत होईल असे आमदार डॉ.पाटील यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना सांगितले. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

Kolhapur Result : हसन मुश्रीफ, आबिटकरांचे मंत्रिपद निश्‍चित; अमल महाडिक, राजेश क्षीरसागरांनाही 'लॉटरी' शक्य

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT