भोकर (नांदेड) : नातीसारख्या असलेल्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या एका पन्नास वर्षीय नराधमास भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम. एस. शेख यांनी बुधवारी (ता. आठ) जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, हिमायतनगर येथील आरोपी व फिर्यादी हे एकाच गल्लीत राहणारे असून फिर्यादीची मुलगी वय आठ वर्षे ही, ता. १६ मार्च २०१९ रोजी घरासमोर थांबलेल्या ऑटो मध्ये संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान खेळत होती. यावेळी नराधम आरोपी बालाजी देवकते (वय ४३) याने त्या बालिकेस आमिष दाखवून जवळच असलेल्या खड्ड्यामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी ती दिसत नसल्याने इतरत्र शोधाशोध केली. पण ती दिसून आली नाही, एका तासानंतती बालिका घराकडे रडत येत असताना तिच्या नातेवाईकांनी पाहिले. रडण्याचे कारण पीडित बालिकेस विचारले असता, तिने बालाजी देवकते याने असा प्रकार केल्याचे सांगितले.
हेही वाचा - हुंड्यावरच अडतेय आजही सोयरीक : कशी ते वाचाच
नराधम आरोपी जामिनावर होता
त्यावरून पिडीत बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरूननराधम बालाजी देवकते याच्याविरुध्द हिम्मयतनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार व बाललैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करून कारागृहात टाकले होते. त्यानंतर त्याचा जामिन झाला होता. तपास करून हिमायतनगर पोलिसांनी भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण बुधवारी जिल्हा न्यायाधीश शेख यांच्यापुढे आले.
न्यायाधीश एम. एस. शेख यांचा निकाल
न्यायालयाने या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासले. तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या व पीडित बालिकेच्या जबाबावरून व वैद्यकीय अहवालाचा आधार घेत न्यायाधीश एम. एस. शेख यांनी बालाजी देवकते यास भादवीच्या कलम ३७६ मध्ये जन्मठेप व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तसेच १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यात सरकारी पक्षातर्फे ॲड. रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली. घटनेचा तपास तत्कालीन तपास अधिकारी फौजदार डी. एस. काळे यांनी केला. तर पैरवी अधिकारी म्हणून श्री काकडे यांनी मदत केली.
येथे क्लीक करा - चोरट्यांची नविन शक्कल, तोडले सीसीटीव्हीचे वायर
न्यायालया परिसरात गर्दी
बलात्कार करणाऱ्या नराधम हा खऱ्या अर्थाने मोठा गुन्हेगार असतो. हा प्रकार घडल्यानंतर हिमायतनगर शहरात तणावाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केल्याने तणाव निवळला होता. पन्नास वर्षीय नराधम जेंव्हा आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार करतो तेंव्हा त्याला ठेचून मारण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. मात्र शेवटी न्यायदेवता श्रेष्ठ आहे. न्यायाधीश शेख यांनी त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावेळी भोकर न्यायालयात हा निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.