लातूर : लिंगायत व हिंदू लिंगायत यांना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण मिळण्यासाठी लिंगायत महासंघातर्फे १२ फेब्रुवारीला उदगीर येथे, २८ फेब्रुवारीला सोलापूर तर पाच मार्चला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत काला - पाटील यांनी दिली.
वीरशैव लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. लाखोंच्या संख्येने कागदपत्रांवर लिंगायत, हिंदू लिंगायत असलेल्या समाजबांधवांना वाणी नावाला लागू असलेले आरक्षण मिळावे, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे,
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज सरसकट लिंगायतांना मिळावे, त्याच्यासाठी शासनाने मोठी तरतूद करावी, महाराष्ट्रभरातील लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुकापातळीवर वसतिगृह सुरू करावे, या व अन्य मागण्यांसाठी लिंगायत महासंघातर्फे हे मोर्चे काढले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.