नांदेड : लिवरच नव्हे तर, अवयव प्रत्यारोपनाची सर्वच प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि तितकीच खर्चीक बाब मानली जाते. घरातील व्यक्तीचा एखादा अवयव निकामी झाला तर, त्या व्यक्तीला अवयवदान करण्यासाठी घरातील व्यक्तीने पुढाकार घेतला तरी, अवयव प्रत्यारोपन करणाची ही प्रक्रिया मोठी असल्याने सहजा सहजी खर्चाचा ताळमेळ बसत नाही आणि अनेक गरजवंत रुग्ण-नातेवाईकांना बेताच्या परिस्थितीमुळे हात टेकावे लागते.
वेळ आणि खर्चातही होणार बचत
मोठ्या शहरातील हॉस्पीटलमध्ये लिवर ट्रान्सप्लांटसाठी किमान ५० ते ६० लाख रुपयापर्यंत खर्च येतो. अवयव प्रत्योरोपन झालेल्या रुग्णास कालांतराने आरोग्य तपासणीसाठी वारंवार त्या हॉस्पीटलमध्ये जावे लागते. शिवाय रुग्णासोबत नातेवाईकांचा वेळ आणि प्रचंड पैसा देखिल खर्च होतो. एवढेच नाहीतर रुग्णासोबतच मानसिकतान देखील सहन करावा लागत होता. मात्र नांदेडच्या ‘ग्लोबल’ हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदाच सुरु झालेल्या ‘यकृत प्रत्योरोपन’ सुविधेमुळे रुग्णांवर होणारा लाखोचा खर्च हा निश्चितच निम्म्यावर येणार असून, वेळेचीही बचत होणार आहे.
हेही वाचा - ब्रेन फिटनेससाठी काय करावे?
या रुग्णालयाचे सहकार्य मिळणार
कुठल्याही रुग्णावर होणारी शस्त्रक्रीया व अवयव प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यशस्विरित्या पार पडावी यासाठी अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टिम असावी लागते. ग्लोबलच्या तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मदतीला पुणे येथील सह्याद्री व चन्नईच्या प्रसिद्ध आपोलो हॉस्पीटल यांच्याशी करार करण्यात आला आहे. त्यामुळे येथील डॉक्टर्स देखिल या लिवर ट्रान्सप्लांटसाठी मोलाचे सहकार्य मिळणार आहे.
‘ग्लोबल’ असल्याचा सार्थ अभिमान काही दिवसांपूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट म्हणजे ‘किडनी ट्रान्सप्लांट’ची. किडनी प्रत्योरोपन सेंटरची मान्यता मिळाल्यापासून ग्लोबलमध्ये पाच कॅडवेरिक डोनेशन पार पडले आहे. पुढील दोन महिण्यात चार रुग्णांवर किडनी ट्रान्सप्लांट होणार आहे. ‘यकृत’ प्रत्यारोपन करुन घेणाऱ्या गरजवंत रुग्ण व नातेवाईकास चांगलाच दिलासा मिळणार आहे. यकृत प्रत्योरोपनाची मान्यता मिळाल्याने खऱ्या आर्थाने रुग्णालयाचे नाव ‘ग्लोबल’ असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे ग्लोबल रुग्णालयाचे प्रमुख डॉ. त्र्यंबक दापकेकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
हेही वाचाच - शासकीय यंत्रणेत शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास घट्टच
झेडटीटीसी’ विभागाकडे नोंदणी करावी लागणार
नांदेडच्या ग्लोबल हॉस्पीटलला लिवर प्रत्यारोपनाकडून शासन मान्यता मिळाली असली तरी, त्यांच्याकडुन अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यांना औरंगाबादच्या ‘झेडटीटीसी’ विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे.
- मनोज गाडेकर (विभागीय समन्वयक झेडटीटीसी, औरंगाबाद.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.