hingoli sakal
मराठवाडा

Hingoli : हिंगोलीत तीन हजारांवर पशुधनाची नोंदणी ; अनुदानासाठी पशुधनास टॅगिंग आवश्यक,दूध उत्पादकांना मिळणार अनुदान

जिल्ह्यात पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी व पशुपालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन हजार १७५ पशुधन तर ९२३ पशुपालक नोंदणी झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे. अनुदानासाठी पशुधनास टॅगिंग व ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी व पशुपालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तीन हजार १७५ पशुधन तर ९२३ पशुपालक नोंदणी झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे. अनुदानासाठी पशुधनास टॅगिंग व ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. दूध उत्पादकांनी पशुधनास कानात टॅगिंग करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या

दुधाला उचित भाव मिळावा यासाठी अनुदान योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात पशुधनास टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करण्यासाठी अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पशुधन नोंदणी ३१७५, पशुपालक नोंदणी ९२३, पशुपालक हस्तांतरण नोंदणी ३००, पशुधनाच्या नोंदीत बदल ३२८, कानातील टॅग बदल नोंदी ७३ याप्रमाणे अतिरिक्त नोंदणी करण्यात आल्या आहेत. तसेच अतिरिक्त्त ८७ हजार २०० टॅग नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पशुधनास टैंगिग करणे व भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी करणे अत्यावशक आहे. त्यानुषंगाने सर्व पशुवैद्यकीय संस्थामार्फत व पशुधनास टॅगिंग पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान मिळणार आहे. सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पामार्फता दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ फॅट, ८.५ एसएनएफ यासाठी किमान २७ रुपये प्रतिलिटर इतका दर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे लागणार आहेत.

त्यानंतर शासनामार्फत पाच रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर रक्कम जमा होणार आहे. दरम्यान, ही योजना ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT